23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

महिलांनी रोज करावी ही 3 योगासनं, जिमशिवाय मिळेल स्लिम-ट्रिम लूक – News18 लोकमत


मुंबई, 14 सप्टेंबर : व्यायाम करणे किंवा योगासने करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नियमित योगा आणि व्यायाम केल्याने अनेक आजार टाळता येतात. तसेच अनेक आजारांपासून आराम मिळतो. व्यस्ततेमुळे किंवा घराबाहेर न पडण्याच्या सवयीमुळे काही वेळा महिलांना व्यायामशाळेत किंवा योग केंद्रात जाणे शक्य होत नाही. अनेक वेळा स्त्रिया इच्छा असूनही जिममध्ये जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या आरोग्याशी तडजोड करतात. मात्र तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरी राहूनही काही खास योगासनांची मदत घेऊ शकता. जे तुम्हाला निरोगी ठेवण्यात चांगली भूमिका बजावू शकतात.

किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊ यूपी येथील ऑर्थोपेडिक सर्जरी विभागाच्या क्लिनिकल योगा इंस्ट्रक्टर डॉ. वंदना अवस्थी यांच्याकडून आम्हाला अशा योगासनांविषयी माहिती मिळाली आहे, जी तुम्हाला निरोगी ठेवण्यास आणि अनेक रोगांपासून मुक्त होण्यास मदत करतील. सकाळी कोणतेही आसन करणे चांगले असले तरी जेव्हा वेळ मिळत नाही तेव्हा जेवणानंतर किमान दोन तासांचे अंतर ठेवा. एवढेच नाही तर ही योगासने करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

चक्की चलनासन

हे योगासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर योगा चटई टाकून बसा. तुमचे दोन्ही पाय पुढे पसरवून त्यात जास्तीत जास्त अंतर ठेवा. या दरम्यान पाठीचा कणा सरळ ठेवा. आता समोर जमिनीवर हात सरळ ठेवून बोटांना एकत्र अडकवा. मग तुमचे हात घड्याळाच्या दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे वर्तुळाकार गतीने जसं जातं चालवतात तसे फिरवा.

Walk केल्यानंतर ही योगासनं करा, पोट अन् श्वासासंबंधित आजारांपासून मिळेल सुटका

त्यानंतर तीच प्रक्रिया विरुद्ध दिशेने करा. सुरुवातीला एक किंवा दोन मिनिटे हे योगासन करा. नंतर हळूहळू वेळ वाढवा. या योगासनाने PCOD च्या समस्येत आराम मिळतो. त्यामुळे अनियमित मासिक पाळी हळूहळू नियमित होते. तसेच वेदना आणि पेटके यापासून आराम मिळतो. इतकंच नाही तर मानसिक ताण कमी होण्यास आणि लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत होते.

फुलपाखरू आसन

फुलपाखराची मुद्रा करण्यासाठी, सूर्याकडे तोंड करून आरामशीर स्थितीत योग चटईवर बसा. त्यानंतर तुमचे दोन्ही पाय पुढे पसरवा आणि दोन्ही तळपाय एकत्र येतील अशा प्रकारे वाकवा. आता दोन्ही हातांनी तळपाय चांगले धरा. आता तुमचे पाय फुलपाखरासारखे हलवा.

हे आसन सुरुवातीला एक किंवा दोन मिनिटे करा. नंतर हळूहळू आपल्या क्षमतेनुसार त्याचा वेळ वाढवा. फुलपाखराची मुद्रा केल्याने पीसीओडीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. यासोबतच पाठदुखी आणि स्नायूंचा ताणही दूर होतो. एवढेच नाही तर गर्भधारणेच्या तीन महिन्यांनंतरही हे आसन करता येते. या आसनामुळे प्रसूती सुलभ होण्यासही मदत होते. फुलपाखराची मुद्रा नियमित केल्याने रक्ताभिसरणही सुधारते.

हृदयविकाराचा झटका कोणालाही येतोय; आजपासून खाण्याच्या सवयींमध्ये करा हे बदल

दंडासन

दंडासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर बसून पाय समोर पसरून जवळ घ्या. नंतर दोन्ही हात थेट मांड्याजवळ खांद्याच्या बरोबरीने जमिनीवर ठेवा. दरम्यान पाठीचा कणा सरळ ठेवा. आता दोन्ही पायांची बोटे आपल्या दिशेने खेचा, काही सेकंद धरून ठेवा, नंतर सोडा. ही प्रक्रिया तुमच्या क्षमतेनुसार दहा ते पंधरा वेळा करा. कोणत्याही वयाच्या आणि स्थितीतील महिला हे आसन सहज करू शकतात. दंडासन केल्याने खांद्यावरील ताणाची समस्या कमी होते. पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत होतो, स्नायू मजबूत होतात आणि पचनशक्ती वाढते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News