22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

मीठ आणि तुरटीने घरातील वास्तुदोष होतील दूर, या उपायांनी लाभेल सुख-संपत्ती


मुंबई, 14 सप्टेंबर : अनेकांच्या बाबतीत असे घडते की, सतत प्रयत्न करूनही यश मिळत नाही आणि व्यवसायात नफाही होत नाही. कुटुंबात नेहमी तणावाचे वातावरण राहते. सर्व काही चांगले करूनही त्याचे इच्छित फळ मिळत नाही. यामागे वास्तु दोष असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोषांमुळे प्रत्येक कामात अडथळे येतात. घरात गरिबी आणि आर्थिक संकट येऊ शकते. नकारात्मक शक्ती वरचढ होऊ लागतात. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, काही सोप्या उपायांनी घरातील सर्व वास्तुदोष दूर करता येतात. आपल्याकडे घरामध्ये असलेल्या मीठ आणि तुरटीनेही तुम्ही वास्तू दोष टाळू (Vastu Tips) शकता.

मिठाने वास्तू दोष निवारण –

वास्तुशास्त्रानुसार, घर नियमितपणे मिठाच्या पाण्याचे पुसले गेले तर घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात.

चुकीच्या दिशेला शौचालयामुळे वास्तू दोष असल्यास काचेच्या भांड्यात खडे मीठ भरून खिडकीमध्ये ठेवल्यास वास्तुदोष दूर होतो. हे मीठ दर दोन महिन्यांनी बदलत राहा.

घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात काचेच्या प्लेटमध्ये सेंधव मिठाचा तुकडा ठेवावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरात सुख-समृद्धी नांदते.

तुरटी आहे उपयोगी –

वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचे छोटे तुकडे खिडकी किंवा दरवाजाजवळ काचेच्या प्लेटमध्ये ठेवा. दर महिन्याला तुरटी बदलत राहा. यामुळे वास्तुदोष दूर होतात. घरात सकारात्मक वातावरण राहते.

कोणाला सतत वाईट स्वप्ने पडत असतील तर झोपताना उशाखाली तुरटी ठेवू शकता. यामुळे भयानक स्वप्ने दिसणे थांबतील.

जर तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नसेल, मन लागत नसेल किंवा तुम्हाला नीट अभ्यास करता येत नसेल तर तुमच्या टेबलावर तुरटीचा तुकडा ठेवा. यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल.

हे वाचा – येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News