25.2 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

हृदयविकाराचा झटका कोणालाही येतोय; आजपासून खाण्याच्या सवयींमध्ये करा हे बदल


नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : अलिकडे सर्वच वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणात हृदयविकाराला बळी पडत आहेत. गेल्या काही महिन्यांत आपण सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक अचानक चालताना-बोलताना-नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडत आहेत. साहजिकच हृदयाच्या आरोग्याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. हृदयविकाराच्या झटक्यासारखी गंभीर स्थिती कशी टाळता येईल, हे जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. आपल्या जीवनशैलीचा आणि खाण्याच्या सवयींचा हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? उत्तम आहार आणि जीवनशैलीत छोटे बदल करून आपण हृदय निरोगी ठेवू शकतो. कोणत्या प्रकारचा आहार तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राखू शकतो, याबद्दल आहारतज्ज्ञांकडून जाणून (Diet To Improve Heart Health) घेऊया.

हृदयाच्या आरोग्याबद्दल आहारतज्ञांचे मत –

मेदांता हॉस्पिटलच्या माजी आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांच्या मते, खाण्यापिण्याचा हृदयासह शरीराच्या इतर भागांवर चांगला-वाईट परिणाम होतो. आरोग्यदायी गोष्टींचे सेवन करून तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता. ह्रदयविकाराच्या वाढत्या रुग्णांचे प्रमुख कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याबाबत वाढती बेपर्वाई. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास हृदयाचे सर्व आजार टाळता येतात. आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केला आणि जंक फूड टाळले तर हृदयाचे आरोग्य बर्‍याच प्रमाणात सुधारू शकते. तुमचा आहार कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो.

आहार आणि हृदयाचा संबंध समजून घ्या –

कामिनी सिन्हा यांच्या मते, तेलकट आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढवतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो. अशा स्थितीत ऑक्सिजनयुक्त रक्त पुरेशा प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचत नाही आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखी घातक स्थिती उद्भवते. हृदयाला योग्य रक्तपुरवठा होण्यासाठी कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रित राखली पाहिजे. कोलेस्ट्रॉलची समस्या प्रामुख्याने खाण्यापिण्यामुळे उद्भवते आणि हेल्दी डायटने सहज नियंत्रित करता येते. थोडक्यात असे म्हणता येईल की, चांगले खाल्ल्याने बहुतेक रोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनाही संतुलित आहारामुळे बराच आराम मिळेल.

हे वाचा – Daily Horoscope: नव्या कामाची सुरुवात करण्याचा आजचा दिवस; ‘या’ राशींना होणार लाभ

या पदार्थांचा आहारात समावेश करा –

आहारतज्ञ कामिनी सांगतात की, हृदय निरोगी ठेवण्यासाठी कमी चरबीयुक्त, कमी कार्बोहायड्रेट आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. दररोज 5 ते 10 मिली पेक्षा जास्त चरबी हानिकारक ठरू शकते. लोकांनी त्यांच्या आहारात हेल्दी चरबीचा समावेश करावा आणि तेलाचे सेवन कमीत-कमी ठेवावे. तुम्ही स्नॅक्सच्या जागी भाजलेले फुटाणे किंवा हरभरे घेऊ शकता. नाश्त्यात आपण मूग डाळ का चीला, फळे, अक्रोड, दलिया आणि ओट्स खाऊ शकता. दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या, डाळी, कोशिंबीर, लो फॅट दूध घेता येईल. रात्रीचे जेवण हलके असावे आणि त्यात खिचडी, दलिया आणि उपमा असे हलके पदार्थ असावेत. जर तुम्ही रात्रीच्या जेवणात भाजी-भाकरी खात असाल तर सकाळच्या जेवणापेक्षा कमी खा. तुम्ही रात्री दूध घेऊ शकता. याशिवाय, दिवसभरात अधिकाधिक पाणी प्या, यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

हे वाचा – झोपेच्या गोळ्यांची सवय हानिकारक; शरीरावर असा होतो गंभीर परिणाम

या उपायांनी हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवा –

– निरोगी जीवनशैली फॉलो करा

– 7 तास पुरेशी झोप घ्या.

– रात्री उशिरापर्यंत जागू नका

– शारीरिक हालचाली करा

– सकस आहार घ्या

– अधिकाधिक पाणी प्या

– तळलेले पदार्थ कमी खा

– जंक फूडपासून दूर राहा

– दारू पूर्णपणे सोडून द्या

– धुम्रपानापासून दूर राहा

– आरोग्य तपासणी करायला विसरू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News