12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Symptoms of paranoid personality disorder in marathi rp


नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे. ज्यामध्ये लहानसहान गोष्टींवरून व्यक्ती सतत अनावश्यक शंका घेऊ लागते. असे लोक विनाकारण त्यांच्या कुटुंबावर, मुलांवर किंवा मित्रांवर संशय घेऊ लागतात, त्यासाठी कारण काहीही असू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल होणे किंवा काहीतरी लपवलं तर शंका घेणं ही गोष्ट कॉमन आहे. परंतु, एखाद्या व्यक्तीची सतत संशय घेण्याची सवय दुर्लक्षित करू नये. सतत संशय घेणे हे पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर सारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. पॅरानोइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो, परंतु त्याची सुरुवातीची लक्षणे प्रौढ वयात दिसू शकतात. PPD या आजारामध्ये संशयामुळे लोक त्यांच्या कोणत्याही नातेसंबंधात आनंदी राहू शकत (Paranoid Personality Disorder) नाहीत.

पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणे:

PPD मध्ये, एखादी व्यक्ती नेहमी अनावश्यक गोष्टींबद्दल विचार करून अस्वस्थ होऊ शकते.

वेब एमडीच्या माहितीनुसार, पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये इतरांनी त्या व्यक्तीसाठी केलेलं सर्व काही त्यांना अपमानित करण्याच्या षडयंत्रासारखे वाटू शकते.

– नेहमी आपल्या मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या भावनांना चुकीचे समजणे.

– खूप भावनिक होणे

– आपल्या जोडीदारावर वारंवार संशय घेणं आणि सतत त्याचा पाठलाग करत राहणे.

– असे लोक कधीही आरामात बसून शांत राहू शकत नाहीत.

हे वाचा – डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

– त्यांना सतत नकारात्मक विचारांनी वेढलेले असते.

– स्वत:च्या प्रत्येक योग्य-अयोग्य गोष्टीला चिकटून राहणं आणि जिद्दी स्वभाव असणं.

– स्वत:ची चूक कधीच मान्य करत नाहीत आणि नेहमी स्वतःला बरोबर मानू लागतात.

– इतरांबद्दल मत्सर आणि द्वेष असणे

– आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सत्य कोणालाच न सांगणे आणि सतत खोटे बोलणे

– इतर लोकांशी कमी सामाजिक संबंध आणि एकटे राहण्याचा प्रयत्न

हे वाचा – ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डरची कारणे:

-त्या माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना घडलेल्या असतात, ज्यांचा त्याच्या मनावर वाईट परिणाम झालेला असतो.

-आयुष्यभर दुःखात आणि संघर्षात जगलेले लोक असं करू शकतात.

– आपली जवळची प्रिय व्यक्ती गेल्यानंतर देखील एखादा व्यक्ती पीपीडी आजाराला बळी पडू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News