22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

अतिशय आनंदाचा आणि गृहसौख्याचा आजचा दिवस; व्यवसायात अनेक लाभ – News18 लोकमत


आज दिनांक १२ सप्टेंबर २०२२. वार सोमवार .आज भाद्रपद कृष्ण द्वितीया. आज तृतीय श्राद्ध आहे. चंद्र आज दिवसभर मीन राशीत आहे.गुरू चंद्र योग आहे. पाहूया आजचे राशी भविष्य.

मेष

राशीच्या व्यय स्थानात आलेला चंद्र अनेक इच्छा आकांक्षा जागृत करेल. गृहसौख्य मिळेल. मेहनत करून यश प्राप्त होईल. शुक्र आज सुंदर खरेदीचे योग आणणार आहे. बरा दिवस.

वृषभ

राशी स्थानात आलेला मंगळ कष्ट देणारा असून अनेक खर्च व अडचणी देईल. स्वभावात तेज येईल. व्यवसायात अनेक लाभ होतील. संतती सुख मिळेल .दिवस उत्तम .

मिथुन

गुरू दशम स्थानातअसून मन कार्य करण्यास उत्सुक होईल . प्रवास, भेटीगाठी होतील. दशम चंद्र आहे. काम वाढेल. घरासाठी आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा.दिवस मध्यम.

कर्क

सप्तम स्थानात शनी जपून राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज भाग्य स्थानात असून घरात शुभ घटना घडतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. दिवस उत्तम आहे.

सिंह

राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत.जपून रहा. मित्र मंडळी पासून अनेक लाभ होतील. प्रकृती जपा. राशीतील रवि बुध अधिकार प्राप्ती करून देतील. दिवस मध्यम.

कन्या

पंचम शनी आणि सप्तम चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे.आर्थिक लाभ, कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. विजय तुमचाच होईल.व्यय रवि आहे डोळ्यांची काळजी घ्या. दिवस शुभ.

तुला

आज दिवस मध्यम असून भाग्य साथ देईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल . खर्च होईल .उच्च शिक्षण आणि संतती साठी शुभ दिवस आहे.

वृश्चिक

आज दिवस अतिशय आनंदी राहण्याचा आहे. गृह सौख्य, जोडीदार ,संतती या बाबत शुभ फळ देईल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.

धनु

द्वितीय स्थानात वक्री शनि कुटुंबात मतभेद घडवून आणेल.लांबचे प्रवास योग येतील .माहिती मिळेल. साहसी आणि कठोर स्वभाव होईल. शांततेत दिवस घालवा.

मकर

आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ वृषभ राशीत असून संतती चिंता राहील.आणि कौटुंबिक कलह होतील. वैवाहिक सुख कमी मिळेल.भावंडं भेट होईल . दिवस मध्यम.

कुंभ

व्यय स्थाना मध्ये वक्री शनि आहे. अचानक स्वभावात कठोरता येईल. कार्य करण्याची इच्छा होईल .रवि बुध कार्य घडवून आणेल . आर्थिक घडामोडी होतील. दिवस उत्तम आहे.

मीन

लाभ स्थानात शनि आणि राशीतील चंद्र अशी ग्रहस्थिती लाभ आणि वैवाहिक सुख दाखवत आहे.आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील .दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News