12.8 C
New York
Monday, March 4, 2024

आज आर्थिक गणितं बिघडण्याचे संकेत; मनस्वास्थ्य सांभाळा; दिवस थोडा कठीण – News18 लोकमत


आज दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रविवार . तिथी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा आज पासून पितृपक्ष सुरू होत आहे. आज चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल.गुरू चंद्र शुभ योग होईल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

सध्या मानसन्मानात वाढ ,आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे.आज भाग्य तुमच्या सोबत राहील.खर्च होईल. कुटुंब सुख मिळेल. चांगला दिवस .

वृषभ

आज लाभ स्थानात चंद्र भ्रमण आहे , तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ होईल. , नातेवाईक भेट असा हा दिवस आहे. प्रकृती आणि मनस्वास्थ्य सांभाळा.

मिथुन

आज व्यवसाय आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. आनंददायी खरेदी, प्रवास काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल. दिवस शुभ.

कर्क

दिवस काही महत्वाचे व्यवहार घडवून आणेल घरात विषेश काम निघेल. मात्र त्यात अडचणी येतील.खर्च झाला तरी प्राप्ती होईल. प्रवास,महत्वाचे संपर्क होतील. मध्यम दिवस आहे.

सिंह

आज कुठूनतरी सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याचे योग येतील. संततीचे सुख चांगले असून . शेजाऱ्यांशी सांभाळून वागा. कामात वाढ होईल.आर्थिक गणित जुळून येतील. दिवस शुभ आहे.

कन्या

घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात यश मिळेल. शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील. आर्थिक लाभ संभवतात.वैवाहिक सुख मिळेल. दिवस उत्तम.

तुला

चंद्राचे षष्ठ स्थानातून भ्रमण आणि सप्तम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे.आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल.दिवस मध्यम.

वृश्चिक

मंगळ घरामध्ये काही तरी ताण निर्माण करेल. सूर्य दशम स्थानात असून अधिकार देणारा आहे. तेज वाढेल. आर्थिक लाभ होतील. दिवस शुभ.

धनु

आज घरातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे .मात्र नवीन संधी मिळेल .दिवस शुभ.

मकर

आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. राहू आरोग्य समस्या निर्माण करील. घरामध्ये अधिकार गाजवाल. आर्थिक लाभ होईल.प्रवास योग येतील. दिवस शुभ .

कुंभ

दिवस आनंद दायक आहे. शांत रहा. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. घराकडे लक्ष द्यावे लागेल. संतती सुख मिळेल कुटुंब सुख लाभेल.दिवस मध्यम.

मीन

व्यवसाय,आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख मिळेल. सध्या गुरू शुक्र शुभ असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News