3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

चेहरा दिसेल नॅचरली यंग आणि ग्‍लोइंग, हे 2 फेस ऑइल वापरून पाहा परिणाम – News18 लोकमत


मुंबई, 11 सप्टेंबर : निरोगी आणि तरुण त्वचेसाठी त्वचेमध्ये नैसर्गिक तेल योग्य प्रकारे निर्माण होणे आवश्यक असते. मात्र, त्वचेचे नैसर्गिक तेलाचे उत्पादन कमी होऊ लागते, तेव्हा त्वचा कोरडी होते आणि चेहऱ्याची चमक कमी होते. अशा स्थितीत, काही नैसर्गिक स्कीन ऑइल त्वचेला फुटण्यापासून (ब्रेकआउट) वाचवतात आणि चेहऱ्यावरील सुरकुत्याही टाळता येतात. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने त्वचा यंग आणि ग्‍लोइंग बनवायची असेल, तर काही फेशिअर तेल खूप फायदेशीर ठरू शकतात. आज जाणून घेऊया कोणत्या दोन फेशियल ऑइलच्या मदतीने आपण त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवू (Facial Oil For Glowing Skin) शकतो.

ग्‍लोइंग त्वचेसाठी फेशियल ऑयल –

बदाम तेल –

त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी बदामाचे तेल खूप फायदेशीर मानले जाते. तुम्हाला कोरडी त्वचा किंवा निस्तेज त्वचा नैसर्गिकरित्या ग्लोइंग करायची असेल, तर बदामाच्या तेलाचा वापर करा. हे तेल व्हिटॅमिन ई आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असून निरोगी त्वचा राखण्यास त्यामुळे मदत होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, बदामाच्या तेलात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, मँगनीज आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते जे त्वचेला चमकदार बनवण्यासाठी आवश्यक असते.

जोजोबा तेल –

जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या कोरडेपणामुळे त्रस्त असाल आणि काही नैसर्गिक उपाय शोधत असाल तर तुम्ही जोजोबा तेल वापरून पाहू शकता. त्वचा सुंदर, चमकदार आणि तरुण ठेवण्यासाठी हे तेल सर्वोत्तम मानले जाते. व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, जस्त आणि तांबे हे घटक यामध्ये भरपूर असतात. त्वचेचे नैसर्गिक तेल वाढवण्यासाठी त्याची खूप मदत होते. हे तेल त्वचा निरोगी ठेवण्यासोबतच तरुण आणि सुरकुत्या मुक्त देखील करते.

हे वाचा – स्कीन केअरमध्ये या 6 गोष्टींचा अतिवापर ठरेल मारक; त्वचेनुसार अशी घ्या काळजी

जर तुम्हाला त्वचेवर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी फेस ऑइल वापरायचे असेल तर जोजोबा ऑइल नक्कीच वापरा. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म देखील आहेत, जे त्वचेवर मुरुमे किंवा कोणत्याही प्रकारची इंफ्लामेशन किंवा संक्रमण बरे करतात. तुम्ही नाईट क्रीम म्हणून वापरू शकता. सर्व प्रथम, आपली त्वचा स्वच्छ करा आणि त्वचेला तेल लावा आणि 5 मिनिटे बोटांनी मालिश करा.

हे वाचा – आत्महत्या करण्यापूर्वी लोकांचे असे असते वर्तन; वेळीच ओळखून करा मदत

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News