23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची वेळ; या 5 टिप्समुळे जीवनात घडेल मोठा बदल


नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : स्व-स्वीकृती (सेल्फ एक्सेप्टेंस) ही अशी गोष्ट आहे जी लगेच मिळवता येत नाही. निघून जात असलेल्या वेळेतूनच ती मिळू शकते. स्व-स्वीकृती आपल्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम करते. त्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर, व्यावसायिक जीवनावर, शिक्षणावर, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक पैलूंवरही परिणाम होतो. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही जाड झाला असाल आणि तुमचे वजन खूप वाढले असेल तर तुमच्या शरीराची ही स्थिती तुम्हाला लाजवेल की, तुम्ही आहे ती स्थिती स्वीकारून आयुष्यात पुढे जाल? जर तुमच्यात त्यासाठी स्व-स्वीकार असेल तर तुम्ही आनंदी राहायला शिकाल. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. केतम हमदान यांनी त्यांच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये अशा काही पाच टिप्स दिल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही स्व-स्वीकृतीला सुलभ बनवू शकता.

स्वत:ला माफ करायला शिका:

स्व-स्वीकृती मिळवण्याचा सर्वात सोपा आणि सरळ उपाय म्हणजे स्वतःला क्षमा करणे. स्वतःबद्दल दयाळूपणा आणि दया दाखवा. तुम्ही तुमच्या मित्राशी जसे बोलता तसे स्वतःशी बोला. स्व-स्वीकृतीसाठी भूतकाळाला कधीही सोबत घेऊन जाऊ नका, त्याऐवजी भूतकाळाकडे एक वेगळी व्यक्ती म्हणून बघा, ज्याला आपण ओळखत नाही किंवा त्याची काळजी करण्याची गरज नाही. पूर्वी मी असा होतो, तसा होतो, पूर्वीच्या त्या गोष्टी चांगल्या होत्या, असे म्हणत बसू नका, भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात आपण काय बदलू शकतो, यावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही तुमच्या चुकांसाठी स्वतःला माफ करायला शिकाल, तेव्हा तुमच्या आयुष्यात बदल सुरू होईल.

मन शांत करा:

स्व-स्वीकृतीसाठी तुम्हाला दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणे थांबवणे. आपल्यापैकी बर्‍याच जणांना आपल्यातील नकारात्मक सेल्फ टॉकची जाणीवही नसते. म्हणजे बरेच लोक त्यांच्या मनात स्वतःबद्दल नकारात्मक विचार-चर्चा करू लागतात. आत्म-स्वीकृतीसाठी आपण आपले मन शांत करणे आणि आपले आंतरिक विचार ऐकणे आवश्यक आहे. तुम्हाला कशामुळे त्रास होत आहे आणि कशामुळे तुम्हाला लाज वाटते याचा नेमका विचार करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News