23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा? रंग आणि इतर गोष्टी जाणून घ्या


मुंबई, 11 सप्टेंबर : कोणत्याही घरातील वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तू योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवल्यास घरातील सदस्यांना अनेक प्रकारे फायदा होतो. घरातील वस्तू वास्तूनुसार नसतील तर त्याचा विपरीत परिणामही दिसून येतो. तसेच घराच्या मुख्य दरवाजाबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब करून आपण आयुष्यातील अनेक समस्या कमी करू शकता. घराचा मुख्य दरवाजा कोणत्या बाजूला असावा, त्याचा रंग काय असावा आदी गोष्टींचीही काळजी घेतली पाहिजे. या विषयावर इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार कृष्णकांत शर्मा वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या दरवाजाची रचना कशी करावी, हे सांगत (Vastu Tips) आहेत.

घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा –

घराचा मुख्य दरवाजा उत्तर, ईशान्य, पूर्व आणि पश्चिम दिशेला असावा, असे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की, घराचा मुख्य दरवाजा या दिशांना असल्याने घरात सुख-समृद्धी येते. याशिवाय जर तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर वास्तु पिरॅमिड ठेवू शकता. असे केल्याने वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वार योग्य राहील.

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा नेहमी दक्षिणावर्ती दिशेने आतल्या बाजूला उघडायला हवा. याशिवाय वास्तुशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळपास स्नानगृह नसावे.

मुख्य दरवाजाचा रंग –

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाचा रंग कसा असावा याबद्दल बोलायचे झाले तर वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, घराचा मुख्य दरवाजा नेहमी हलका पिवळा, बेज किंवा लाकडाच्या हलक्या रंगाचा असावा. याशिवाय तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा रंगही बेजही ठेवू शकता.

हे वाचा –  Pitru Paksha 2022: पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये? हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, घराच्या मुख्य दरवाजाचा रंग नेहमी हलका/फिकट ठेवावा. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कधीही चमकदार रंगांनी रंगवू नये. याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य दरवाजाजवळ डस्टबिन, तुटलेल्या खुर्च्या, टेबल इत्यादी ठेवू नयेत. तसेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वस्तिक, ओम, क्रॉस, रांगोळी किंवा फुलांनी सजवावा.

वाचा – संध्याकाळच्या वेळेस झोपू नये असं का म्हणतात? ही आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

 (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News