3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

सायकलिंगमुळे सुधारतो फिटनेस, हृदयविकारासह आजारांचा धोका होतो कमी – News18 लोकमत


नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : आजच्या युगात बहुतांश लोकांची जीवनशैली बिघडली असून त्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत. यामुळे रोगांचा धोका कमी होतो आणि फिटनेस सुधारतो. आजकाल फार कमी लोक सायकल चालवताना दिसतात. मात्र, सायकल चालवणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपला फिटनेस तर सुधारतोच पण अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. सायकलिंगचे आरोग्य फायदे जाणून (Cycling Health Benefits) घेऊया.

उत्तम आरोग्य आणि फिटनेस –

बेटर हेल्थच्या अहवालानुसार, दररोज सायकल चालवल्याने फिटनेस सुधारतो आणि एकूण आरोग्य सुधारते. हा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे, जो कोणत्याही वयोगटातील लोक सहजपणे करू शकतात. सायकलिंग तुमचे स्नायू, हाडे आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सायकलचा प्रवास वाहनांच्या तुलनेत सुरक्षित मानला जातो. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते कमी किंवा जास्त वेगाने चालवू शकता. सायकलिंगमुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, मधुमेह, नैराश्य, लठ्ठपणा आणि संधिवात यांचा धोका कमी होतो.

हे वाचा – आत्महत्या करण्यापूर्वी लोकांचे असे असते वर्तन; वेळीच ओळखून करा मदत

सायकल चालवण्याचे महत्त्वाचे आरोग्य फायदे –

कार्डिओव्हस्कुलर फिटनेस चांगला राहतो.

स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढते

जॉइंट मोबिलिटी सुधारण्यासाठी प्रभावी

तणाव पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर

पोस्टर आणि कोआर्डिनेशन सुधारण्यासाठी उपयुक्त

हाडे मजबूत होतात

चरबी लेव्हल कमी करण्यासाठी प्रभावी

विविध आजार टाळण्यास मदत होते.

चिंता आणि नैराश्य कमी होते.

वजन कमी करण्यासाठी दररोज सायकलिंग करा.

हे वाचा – स्कीन केअरमध्ये या 6 गोष्टींचा अतिवापर ठरेल मारक; त्वचेनुसार अशी घ्या काळजी

वजन कमी कण्यासाठी प्रयत्न करत असणाऱ्यांसाठी दररोज सायकल चालवणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे चयापचय गती वाढते, स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील चरबी बर्न होते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सायकल चालवणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला सकस आहारही घ्यावा लागेल. विशेष म्हणजे तुम्ही तुमची छोटी-मोठी कामेही सायकलच्या माध्यमातून करू शकता. तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी सायकलिंग करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News