22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Green Apple चे हे फायदे तुम्हाला माहितीयत का? वजन कमी करण्यापासून ते वृद्धत्व थांबवण्यासाठी देखील फायदेशीर


मुंबई 11 सप्टेंबर : फळं ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असल्याचे म्हटलं जातं, म्हणून तर डॉक्टर देखील आपल्या फळं खाण्याचा सल्ला देतात. त्यात सफरचंद शरीरासाठी खूपच चांगलं असल्याचं मानलं जातं. सफरचंदाबद्दल असे ही म्हटले जाते की, दररोज एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरपासून लांब ठेवू शकतो. म्हणजेच काय तर तो तुम्हाला कोणत्याही आजारापासून लांब ठेवतो. पण तुम्हाला याचे आणखी फायदे माहित आहेत?

पण आता सफरचंद म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर लाल किंवा थोड्या गुलाबी रंगाचा सफरचंद येईल. परंतु तुम्हाला माहितीय बाजारात हिरवा सफरचंद देखील आहे. तसे पाहाता हे सफरचंद लाल सफरचंदाइतकेच आरोग्यदायी असतात. मात्र, ते चवीला किंचित आंबट आणि गोड असतात.

परंतू हिरव्या रंगाच्या सफरचंदाचे  स्वतःचे आरोग्य फायदे देखील आहेत. ते पोषक, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांनी परिपूर्ण आहेत जे संपूर्ण आरोग्यासाठी चांगले आहेत. हिरव्या सफरचंदांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करते.

आता असे अनेक लोक आहेत, जे सफरचंदाची साल काढून खातात. परंतू तुम्ही असं करण्याची चूक करु नका, कारण यामध्ये त्याची सालच खूप आरोग्यादायी आहे. त्यात भरपूर फायबर असल्यामुळे सफरचंद शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. हे यकृत आणि पचनसंस्थेला हानिकारक पदार्थांपासून दूर ठेवते. हे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करते.

चला जाणून घेऊ की, हिरवे सफरचंद कोण-कोणत्या गोष्टीसाठी कसे फायदेशीर आहेत?

हिरवे सफरचंद रक्तातील कोलेस्टेरॉल आणि बीपी कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यासाठी आणि भूक सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहेत. हिरव्या सफरचंदांच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी सविस्तर जाणून घेऊ.

हे वाचा : How to Control Cholesterol level : ‘हे’ पदार्ख वाढवू शकतात तुमची कोलेस्टेरॉल लेव्हल; आजच करा गुडबाय!

हिरवे सफरचंद वजन कमी करण्यास मदत करतात

हिरव्या सफरचंदांमध्ये फायबर असते आणि त्यात फॅट, साखर आणि सोडियम कमी असते. हिरव्या सफरचंदाचा रस भूक कमी करण्यासाठी ओळखला जातो. शिवाय, ते कॅलरी बर्न करण्याची क्षमता सुधारते, जे तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यात मदत करते.

हिरवे सफरचंद तुमच्या यकृतासाठी चांगले असतात

नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग एजंट असण्यासोबतच हिरव्या सफरचंदाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सला यकृताचे नुकसान होण्यापासून रोखतात. हे यकृतामध्ये जळजळ होण्यास प्रतिबंध करते. तसेच नेहमी फुगलेले पोट (bloating) ला देखील कमी करण्यात मदत करते, ज्यामुळे पोट देखील कमी होते.

फुफ्फुसासाठी फायदेशीर

अभ्यास दर्शविते की हिरव्या सफरचंदाच्या रसाचा नियमित वापर केल्याने दम्याचा धोका 23% कमी होतो. जे लोक नियमित धूम्रपान करतात ते देखील त्याचा रस पिऊ शकतात. याद्वारे ते फुफ्फुसाच्या अडथळ्यांच्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात.

मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव नियंत्रित करते

हा हिरवा सफरचंदाचा रस व्हिटॅमिन केचा संभाव्य स्रोत आहे, एक घटक जो रक्ताच्या गुठळ्या होण्यास मदत करतो. जे लोक हा रस पितात त्यांच्यात जखमा दुरुस्त आणि बरे करण्याची क्षमता असते. ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव आणि वेदना होतात त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्यासाठी महिलाही या पेयाचा वापर करू शकतात.

हे वाचा : Immune Booster Foods: मुलांची रोगप्रतिकारकशक्ती बनेल स्ट्राँग; या पदार्थांचा आहारात करा समावेश

वृद्धत्व थांबवतो

हिरव्या सफरचंदांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, जसे की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फिनोल्स, अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करतात. शरीरात असलेल्या फ्री रॅडिकल्समुळे सुरकुत्या, बारीक रेषा आणि काळे डाग येऊ लागतात. या अँटिऑक्सिडंट-समृद्ध पेयाचा नियमित वापर केल्याने शरीराला या मुक्त रॅडिकल्सशी लढा देण्यात आणि त्यामुळे होणारे नुकसान दूर करण्यात मदत होऊ शकते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News