25.2 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

ऑनलाइन शॉपिंग करताना अशा गोष्टींची घ्या विशेष काळजी; या चुका केलात तर फसाल


मुंबई, 09 सप्टेंबर : शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही. आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. ऑनलाईनमध्ये स्मार्टफोन, ड्रेस आणि फूटवेअरच्या खरेदीला लोक महत्त्व देतात. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससोबतच आपल्या आवडत्या अ‍ॅक्सेसरीजची खरेदी करण्याचेही अनेकांना शौक आहे. ऑनलाइन शॉपिंगसाठी अनेक गोष्टी उपलब्ध असल्याने शॉपिंगची क्रेझ खूप वाढली आहे. मात्र, ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपण अधिक पर्यायांसह घरी बसून आपल्या आवडत्या वस्तू ऑर्डर करू शकता. पण, ऑनलाइन शॉपिंग करताना लोक अनेकदा काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. यामुळे तुमचा पैसा तर वाया जातोच, पण तुम्हाला तुमची आवडती वस्तूही मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत काही स्मार्ट टिप्स फॉलो करून तुम्ही ऑनलाइन शॉपिंग सहज करू (Online shopping tips) शकता.

विश्वसनीय साइटवरून खरेदी करा –

अनेक वेळा लोक स्वस्त वस्तू पाहून अनोळख्या साइटवरूनही खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. बहुतेक अज्ञात साइट सुरक्षित नसतात. येथे खरेदी केल्याने तुमचे खाते हॅक होण्याची शक्यता असते आणि तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी देखील होऊ शकता. म्हणून, ऑनलाइन खरेदीसाठी विश्वसनीय आणि सुप्रसिद्ध साइट निवडणे चांगले असते.

https तपासा –

ऑनलाइन खरेदी करताना काही लोक नकळत https आणि http मधील फरक लक्षात घेण्यास विसरतात. https साइटवर ‘S’ सुरक्षा चिन्ह म्हणून असते. अशा परिस्थितीत http साइटऐवजी https साइटवरून खरेदी करा. याशिवाय खरेदी करताना दुकानदाराचा पत्ता, फोन नंबर आणि ईमेल पत्ता तपासण्याची खात्री करा.

पेमेंट करताना लक्ष द्या –

ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या प्रकरणात व्हॅरिफाईड बाय व्हिसा किंवा मास्टरकार्ड सुरक्षित कोड वापरणे चांगले. या पेमेंट सिस्टमद्वारे खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता कमी असते आणि तुम्ही योग्य पद्धतीने पेमेंट करू शकता.

हे वाचा – डायनिंग टेबल घरात कोणत्या दिशेला असावे? त्याचे हे वास्तु नियम ध्यानात ठेवा

सविस्तर माहिती वाचा –

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचायला विसरू नका. बर्‍याच वेळा, मर्यादित ऑफर पाहून, ग्राहक घाईत वस्तू खरेदी करतात आणि डिलिव्हरी शुल्क किंवा कोणतेही छुपे शुल्क पाहत नाहीत. यामुळे तुम्हाला वस्तूसाठी बजेटपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

हे वाचा –  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

ऑर्डर तपासा –

ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा परिस्थितीत तुमची ऑर्डर डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच पॅकेट उघडून ते तपासा आणि काही त्रुटी आढळल्यास डिलिव्हरी बॉयसोबत सामानाचा फोटो घ्या. याचा तुम्हाला तक्रार दाखल करण्यात आणि पैशांचा दावा करण्यासाठी मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News