22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

नाती वाढवायला हवीत; म्हणून फक्त एक नको, दोन तरी मूलं हवीत – News18 लोकमत


मूलं नको म्हणणाऱ्यांप्रमाणेत मूलं हवीत म्हणणाऱ्या तरुणाईचं प्रमाण प्रचंड आहे. त्यातही अनेक पालकांना तर किमान दोन मूलं व्हावीत अशी अपेक्षा असते. बऱ्याचदा करिअर, नोकरी, आर्थिक तणाव याचा विचार करता दाम्पत्य एकाच मुलावर आनंद मानतात. दुसरं मूल म्हणजे पुन्हा शाळेचा खर्च, त्याचं शिक्षण, दररोजच्या खर्चात वाढ होते. त्यामुळे दोघेही नोकरी करीत असतील तर एकाच मुलात समाधान मानतात. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना किमान दोन मूलं व्हावीत अशी अपेक्षा असते.

नमस्कार मी, सीमा (नाव बदललेलं आहे) . माझा जन्म सातारचा. मात्र आई-बाबा पुढे नोकरीसाठी पुण्यात आले. आणि माझं बालपणदेखील पुण्यातचं गेलं. मला दोन मूलं आहेत. मोठा मुलगा आणि दुसरी मुलगी. या लेखाच्या विषयाप्रमाणे आम्हाला दोन मूलं असावीत, ही माझीच इच्छा होती. सध्या नाती संपत चालली आहे, असं आपण म्हणतो त्यामागील हे महत्त्वाचं कारण असं मला वाटतं. अनेक घरांमध्ये एकच मूल असल्या कारणाने त्याला बहिण, भाऊ याचं प्रेम मिळत नाही. चुलत भाऊ-बहिण असतात, मात्र त्यांच्याशी नेहमीच बोलणं होत नाही. कधीतरी भेटीगाठी होतात. पूर्वीच्या काळी सण-उत्सवात अक्षरश: मोठा गोतावळा घरात जमा व्हायचा. त्यावेळी घर कसं भरून जायचं. आजूबाजूला नात्याची, रक्ताची माणसं असायची. भांडणं व्हायची, पण त्याचबरोबर शेअरिंगही व्हायचं. भाऊ-बहिण, मामा-मामी, काका-काकी, नातू-नात, असं सर्वजण एकत्र यायचे. आपली सुख, दु:ख शेअर करायचे. शेअरिंग होत असल्याने मानसिक ताण कमी व्हायचा. कदाचित यामुळेच आधी नैराश्याचं प्रमाण आताच्या तुलनेत कमी होतं.

Digital Prime Time : मी अन् माझी क्रिकेट टीम, अनेक दत्तक मुलं घेण्याचा वाढतोय ट्रेंड!

मुलांमधील एकलकोंडेपणा..

घरात एकुलता एक मुलगा-मुलगी असेल तर मुलांमधील एकलकोंडेपणा वाढतो. त्यांना भाऊ-बहिणीचं प्रेम काय असतं, याची जाणीवच राहत नाही. शेअरिंगची सवय नसते. आधी आपल्याकडे जे आहे ते वाटून खाण्याची पद्धत होती. अगदी एक बिस्किटचा पुडा असला तरी सर्व भाऊ-बहिणी ते वाटून खात. मात्र घऱात एकच मूल असल्या कारणाने तो कोणासोबत शेअर करीत नाही. एकटं राहण्याची सवय वाढते. यातून मोबाइलचं आणि गेमिंगचं व्यसन जडलं. आई-बाबांचा अधिकतर वेळ नोकरीवर असतात. त्यामुळे आपले सुख-दु:ख शेअर करायला कोणीच नाही ही भावना वाढीस लागते.

परिणामी मानसिक तणाव वाढतो. सर्वच एकुलत्या एक मुलांना हे सर्व भोगावं लागतं, असं नाही. पण त्यातही अशी शक्यता उद्भवण्याचं प्रमाण जास्त आहे.

या वयात करिअरवर फोकस; आई होण्याची आधीच करून ठेवलीय तयारी

पुढच्या पिढीने आकाशात उंच भरारी घ्यावं. आधुनिक व्हावं..तंत्रज्ञानाचा वापर करावा. खूप नावलौकिक मिळवावा. मात्र याचवेळी त्याने नाती जपावीत. कुटुंब हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. कुटुंब यातून आपणं उभं राहिलो, शिकलो..आपल्यावर झालेले संस्कार कुटुंब या संरचनेतूनच झाले आहेत. त्यामुळे नाती जपायला हवीत, असं मला वाटतं.

मी घरातील शेडेंफळ होते. त्यामुळे माझे खूप लाड झाले. आई-बाबा जेव्हा नोकरीला जायचे. तेव्हा माझा मोठा भाऊ माझी काळजी घ्यायचा. अगदी मी बाळ असल्यापासून. मला खाऊ-पिऊ घालणं, झोपवणं सर्व सर्व काही तो करायचा. सुख-दु:खात आम्ही एकमेकांना साथ दिली. घरातील चार भितींत आमचं जग होतं. भांडणंही तितकीच व्हायची पण शेअरिंगही व्हायची. त्यामुळे आमच्यापैकी कोणीही कधीच एकटं पडलं नाही.

माझ्या मुलालाही हे सर्व मिळावं, त्यांना दादा, ताई म्हणणारं कोणी असावं, म्हणून दोन मूलं व्हावीत, ही अपेक्षा होती. सध्या स्पर्धा आहे, महागाई वाढली आहे, असं म्हणून आपण एकच मुलावर थांबतो. पण याचं भविष्य कसं असेल, यातून नाती कशी टिकतील, मुलांची मानसिकता कशी निर्माण होत जाईल, याचा विचार कधी केला आहे का आपण?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News