3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

पितृपक्षात कोणत्या दिवशी कोणत्या पितरांचे करावे श्राद्ध? – News18 लोकमत


मुंबई, 8 सप्टेंबर : हिंदू धर्मात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी धार्मिक कर्म करण्याची श्रद्धा आहे. हिंदू कॅलेंडरनुसार पितृ पक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान, श्राद्ध इत्यादी करतात. असे केल्याने त्यांची कृपा राहते आणि त्यांना सुख मिळते असे मानले जाते. त्यांच्या आशीर्वादाने जीवनात यश, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. मात्र तुम्हाला माहित आहे का? कोणत्या तिथीला कोणत्या पितरांचे पिंडदान केले जाते. त्याबद्दल माहिती घेऊया.

10 सप्टेंबर : प्रतिपदा श्राद्ध – झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांचा मृत्यू प्रतिपदेला झाला आहे, त्यांचे श्राद्ध अश्विन कृष्ण महिन्याच्या प्रतिपदेला केले जाते.

11 सप्टेंबर : द्वितीयेचे श्राद्ध – ज्या लोकांचा मृत्यू कोणत्याही द्वितीयेला झाला असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाईल.

12 सप्टेंबर : तृतीयेचे श्राद्ध – ज्यांचा मृत्यू तृतीया तिथीला झाला आहे, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाईल.

13 सप्टेंबर : चतुर्थीचे श्राद्ध – ज्या लोकांचा मृत्यू चतुर्थी तिथीला झाला असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाईल.

Pitru Paksh 2022 : पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान

14 सप्टेंबर : पंचमीचे श्राद्ध – असे लोक ज्यांचे लग्न झाले नव्हते आणि ज्यांचा पंचमीच्या दिवशी मृत्यू झाला. या दिवशी त्यांचे श्राद्ध होईल.

15 सप्टेंबर : षष्ठीचे श्राद्ध – ज्या लोकांचा मृत्यू षष्ठीतिथीला झाला असेल, त्यांचे श्राद्ध षष्ठीतिथीला केले जाते.

16 सप्टेंबर : सप्तमीचे श्राद्ध – सप्तमीच्या तिथीला मृत्यू झालेल्यांचे या दिवशी श्राद्ध होईल.

17 सप्टेंबर : या दिवशी श्राद्ध होणार नाही.

18 सप्टेंबर : अष्टमीचे श्राद्ध – अष्टमीच्या तिथीला मृत्यू झालेल्यांची या दिवशी पूजा केली जाईल.

19 सप्टेंबर : नवमीचे श्राद्ध – नवमी तिथीला विवाहित महिला आणि मातांचे श्राद्ध करणे उत्तम मानले जाते. म्हणूनच याला मातृनवमी श्राद्ध असेही म्हणतात.

20 सप्टेंबर : दशमीचे श्राद्ध – दशमीच्या दिवशी ज्या लोकांचा मृत्यू झाला असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाईल.

21 सप्टेंबर : एकादशीचे श्राद्ध – मृत तपस्वींचे श्राद्ध एकादशी तिथीला केले जाते.

Pitru Paksha 2022 : पितृ पक्षात कावळे इतके महत्त्वाचे का? त्यांनाच का दिलं जातं अन्न

22 सप्टेंबर : द्वादशीचे श्राद्ध – ज्या लोकांचा मृत्यू द्वादशीच्या दिवशी झाला असेल किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहित नाही अशा लोकांचे या दिवशी श्राद्ध करता येते.

23 सप्टेंबर : त्रयोदशीचे श्राद्ध – त्रयोदशीला फक्त मृत मुलांचे श्राद्ध केले जातात.

24 सप्टेंबर : चतुर्दशीचे श्राद्ध – जे लोक काही अपघात, रोग किंवा आत्महत्येमुळे मरण पावतात, त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते. अकाली मरण पावलेल्या लोकांचे श्राद्ध या दिवशी केले जाते. त्यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला याने फरक पडत नाही.

25 सप्टेंबर : अमावस्या श्राद्ध – सर्वपित्री श्राद्ध – या दिवशी श्राद्ध-तर्पण अवश्य करा जेणेकरून ज्या पितरांची तारीख माहित नाही, त्या सर्वांचे विधी पार पडतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News