22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

बस्सं! हे छोटेसे बदल आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनपासून मिळेल आराम – News18 लोकमत


मुंबई, 09 सप्टेंबर : युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय इन्फेक्शन कोणालाही होऊ शकते. परंतु युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची तक्रार महिलांमध्ये सर्वाधिक दिसून येते. खरं तर, स्त्रियांच्या मूत्रमार्गाची लांबी पुरुषांच्या मूत्रमार्गापेक्षा कमी असते. त्यामुळे लवकर बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. मूत्रमार्गाचा संसर्ग बहुतेकदा अशा लोकांना होतो जे स्वच्छतेची अजिबात काळजी घेत नाहीत. जर तुम्ही घाणेरडे टॉयलेट वापरले असेल किंवा घाणेरडे पाणी वापरले असेल तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. या बाजूने काळजी घेतली तर ते फार धोकादायक ठरू शकते. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

UTI ची लक्षणे

– लघवी करताना जळजळ जाणवणे.

– वारंवार लघवी होणे.

– लघवीचा रंग गडद होणे.

– लघवीला खूप वास येतो.

– लघवी करताना अडथळा जाणवणे.

Health Tips: अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय; लगेच होईल परिणाम

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनवर उपाय

भरपूर द्रव प्या

हेल्थ लाईननुसार, मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अधिकाधिक द्रव पदार्थ प्या. यामुळे लघवी निघण्यास मदत होईल. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर लघवीही जाणार नाही. त्यामुळे संसर्ग अधिक पसरण्याची भीती आहे.

आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश करा

व्हिटॅमिन सीमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचाव करण्याची क्षमता असते. व्हिटॅमिन सी मूत्रात आम्ल वाढवते आणि संक्रमणास कारणीभूत जंतू नष्ट करते. संत्री, द्राक्ष, लिंबू, मोसमी, टोमॅटो, किवी यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. गरोदरपणात महिलांनी व्हिटॅमिन सी युक्त अन्नाचे सेवन करावे.

Food Expiry Date : एक्स्पायरी डेटवर अवलंबून राहू नका; हे खाद्यपदार्थ त्याआधीही होऊ शकतात खराब

क्रॅनबेरी रस प्या

क्रॅनबेरीचा रस मूत्रमार्गात होणारे संक्रमण रोखण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. त्याचा दररोज आहारात समावेश केला पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News