3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

‘माझ्या शरीरातील तुकडा काढून देतो पण…’; शिक्षा नव्हे आजारातून बाबांना वाचवण्यासाठी 17 वर्षीय लेक सुप्रीम कोर्टात


लखनऊ, 09 सप्टेंबर : सामान्यपणे कोर्ट म्हटलं की गुन्ह्यांची प्रकरणं. कनिष्ठ पातळीवर कोर्टात हवा तसा निकाल किंवा न्याय मिळाला नाही की लोक सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावतात. पण एका मुलाने आपल्या वडिलांना कोणत्या गुन्ह्याच्या शिक्षेतून वाचवण्यासाठी किंवा न्याय मिळवून देण्यासाठी नव्हे तर त्यांना आजारातून वाचवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. 17 वर्षांच्या मुलाने वडिलांसाठी कोर्टात याचिका केली आहे.

उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण. 17 वर्षांच्या या मुलाचे पालक आजारी आहेत. त्यांना यकृताची समस्या आहे. त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे. मुलगा आपल्या वडिलांना आपल्या शरीरातील यकृताचा भाग द्यायला तयार आहे. पण तो अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. आपल्या वडिलांना आपलं लिव्हर देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका त्याने कोर्टात केली.

हे वाचा – 15 वर्षांच्या मुलाने प्रायव्हेट पार्टसोबत केला नको तो खेळ; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

आईवडिल आपल्या मुलांसाठी धडपडत असतात. त्यांच्यासाठी वाट्टेल ते करतात. मुलांसाठी झटणाऱ्या अशा पालकांच्या स्टोरी तुम्हाला माहिती असतील. पण आईवडिलांसाठी झटणारी मुलं क्वचितच. तेसुद्धा वयाच्या सतराव्या वर्षी… या वयातील मुलं म्हणजे ऐन तारुणाच्या उंबरठ्यावर असतात, अनेकांसाठी मजामस्ती करण्याचं हे वय असतं. पण या वयात हा मुलगा मात्र आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी धडपडतो आहे.

आज तकच्या वृत्तानुसार कोर्टाने या याचिकेवर सुनावणी केली.  याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. यूपीच्या आरोग्या विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीला हजर राहायला सांगितलं आहे. 12 सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहेत. लिव्हर दान करता येऊ शकतं की नाही हे पाहण्यासाठी अल्पवयीन मुलाची प्राथमिक चाचणी केली जाईल.

हे वाचा – धक्कादायक! एका घोटातच गेला तरुणाचा जीव; कॉकटेल ड्रिंकमुळे भावी डॉक्टरचा मृत्यू

आता कोर्ट या मुलाची मागणी पूर्ण करतं की नाही, त्याला आपल्या वडिलांना आपल्या यकृताचा भाग देता येतो की नाही, हे कोर्टाच्या पुढील सुनावणीतच समजेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News