27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Cholesterol level can be reduced with the help of garlic know what else will benefit in Marathi rp


मुंबई, 09 सप्टेंबर : लसणाचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी केला जातो. लसणात सल्फर, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हृदयरोग, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यास त्यामुळे मदत होते. लसणामध्ये अॅलिसिन नावाचे एक संयुग असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. लसणाव्यतिरिक्त, स्वयंपाकघरात असे अनेक सुपर फूड आहेत, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. मशरूम आणि कांदे देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी आणि घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ (Food For Reduce Cholesterol Level) शकतो.

ऑलिव्ह तेल आणि लसूण

लसणात मँगनीज आणि अॅलिसिन नावाचे संयुगे भरपूर असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, लसणात अनेक औषधी गुणधर्म भरलेले आहेत. लसूण अन्नाबरोबर किंवा मसाला म्हणून पदार्थांमध्ये घालून खाऊ शकतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, लसूण ऑलिव्ह ऑइलमध्ये उकळता येते किंवा सॅलडमध्ये ड्रेसिंग म्हणून वापरले जाऊ शकते. लसणात एकूण कोलेस्ट्रॉल प्रति डेसीलिटर 30 मिलीग्रामपर्यंत कमी करण्याची क्षमता असते.

काळी मिरी फायदेशीर –

काळी मिरीमधून निघणारी उष्णता रक्त पंपिंगचे कार्य सुधारण्यासाठी काम करू शकते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच काळी मिरी रक्तवाहिन्या, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि पक्षाघाताचा धोका कमी करू शकते. काळी मिरी सूप, सॅलड किंवा पेयांमध्ये ड्रेसिंग म्हणून वापरली जाऊ शकते.

हे वाचा – या राशीचे लोक असतात खूप सपोर्टिव्ह, तुमच्याही आयुष्यात आहे का अशी एखाद व्यक्ती?

ताजी फळे खा –

फक्त भाज्याच नाही तर ताजी फळे देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. फळांपासून जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारचे पॉलिफेनॉल मिळतात, जे हृदयाच्या समस्या आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. फळे वनस्पती-आधारित आहेत, जे शरीराला अधिक फायदे आणतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सफरचंद, आंबा, मनुका, द्राक्षे आणि जांभूळ यांचे सेवन करू शकता.

हे वाचा – एजंट काही सेकंदात ट्रेनचं तिकीट बुक करतात, मग सर्वसामन्यांना का नाही जमत?

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News