13.3 C
New York
Monday, March 4, 2024

flue vaccine मुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो? तज्ज्ञांच्या अहवालातून समोर आली महत्त्वाची माहिती


मुंबई : दरवर्षी फ्लू शॉट घेणं म्हणजे तापाची लस घेणं स्ट्रोकची जोखीम कमी करू शकतं, असं एका अभ्यासातून समोर आलंय. या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या मेडिकल जर्नलमध्ये (Medical Journal of the American Academy of Neurology) प्रकाशित झाले आहेत.

“अभ्यासात असं दिसून आलंय की फ्लूमुळे तुम्हाला स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो, परंतु, फ्लूची लस घेतल्याने स्ट्रोकपासून संरक्षण मिळू शकतं का, यावर संशोधन सुरू आहे. मात्र जे फ्लूचा शॉट घेतात, त्यांना स्ट्रोकचा धोका कमी असतो, असं या निरीक्षणात्मक अभ्यासातून दिसून आलंय.

हे लसीच्या संरक्षणात्मक परिणामामुळे आहे की, इतर घटकांमुळे आहे, हे समजून घेण्यासाठी अजून जास्त संशोधन करणं आवश्यक आहे,” असं अभ्यासाचे लेखक आणि स्पेनमधील माद्रिदमधल्या अल्काला युनिव्हर्सिटीतील (University of Alcala in Madrid) प्रा. डॉ. फ्रान्सिस्को जे. डी अबाजो यांनी सांगितलं.

हा अभ्यास करताना इस्केमिक स्ट्रोकचा (ischemic stroke) विचार करण्यात आला. तो मेंदूला पुरवठा करणाऱ्या नलिकेत अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो आणि हा स्ट्रोकचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी स्पेनमधील हेल्थ केअर डेटाबेस (health care database in Spain) पाहिला आणि त्यातून कमीतकमी 40 वर्षं वय असलेले लोक ज्यांना 14 वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदा स्ट्रोक झाला होता, त्यांची ओळख पटवली.

स्ट्रोक झालेल्या प्रत्येक व्यक्तीची तुलना त्यांच्या समान वयाच्या आणि लिंगाच्या पाच लोकांशी करण्यात आली. त्यापैकी 14,322 लोकांना स्ट्रोक झाला होता आणि 71,610 लोकांना स्ट्रोक झाला नव्हता. त्यानंतर संशोधकांनी स्ट्रोक झालेल्यांना 14 दिवस आधी किंवा ज्यांना स्ट्रोक झाला नाही त्यांना त्याच तारखेपूर्वी इन्फ्लूएंझा लस (Influenza Vaccine) घेतली होती की नाही, याबद्दल माहिती गोळा केली.

स्ट्रोक झालेल्यांपैकी एकूण 41.4% लोकांना फ्लूचा शॉट मिळाला होता, ज्यांच्या तुलनेत 40.5% लोकांना स्ट्रोक झाला नव्हता. परंतु, ज्या लोकांना शॉट मिळाला त्यांचं वय जास्त असण्याची आणि त्यांना उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल सारखे इतर आजार असण्याची शक्यता जास्त होती, परिणामी, त्यांना स्ट्रोक होण्याची शक्यताही जास्त होती.

एकदा संशोधकांनी त्या घटकांशी जुळवून त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांना आढळलं की ज्यांना फ्लूचा शॉट मिळाला आहे, त्यांना स्ट्रोक होण्याची शक्यता शॉट न घेणाऱ्यांच्या तुलनेत 12% कमी आहे. दरम्यान, त्यानंतर संशोधकांनी न्यूमोनियाच्या लसीचा स्ट्रोकच्या रिस्कवर काही परिणाम होतो की नाही, याचाही अभ्यास केला. परंतु त्यात कोणतेही प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आढळले नाहीत.

“या निष्कर्षांमुळे लोकांनी त्यांचे वार्षिक फ्लू शॉट घेण्यासाठी त्यांना आणखी एक सकारात्मक कारण मिळणार आहे. स्ट्रोकचा धोका एका फ्लू शॉटने कमी होत असेल तर तो घ्यायलाच हवा,” असं डी. अबाजो म्हणाले. दरम्यान, हा एक निरीक्षणात्मक अभ्यास असल्याने, फ्लू शॉट घेतल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो हे सिद्ध होत नाही. त्यामुळे स्ट्रोकच्या रिस्कवर परिणाम करणारे इतर घटक असू शकतात जे अभ्यास करताना गृहीत धरले गेले नसतील, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News