3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

Health benefits of eating betel leaf and tulsi seeds together mhpl gh


मुंबई, 09 सप्टेंबर : काही वनस्पती औषधी व आरोग्याला उपकारक असतात. आयुर्वेदानुसार तुळस ही अशी एक वनस्पती आहे, जिचा अनेक औषधांमध्ये वापर केला जातो. हिंदू संस्कृतीत तुळशीला अतिशय महत्त्व आहे. तिचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊनच तुळशीचा धार्मिक कार्यातला वापर कदाचित वाढला असावा. तुळशीप्रमाणेच विड्याचं पानही अनेक धार्मिक कार्यांमध्ये वापरलं जातं. अन्नसेवनानंतर विड्याची पानं खाल्ल्यास पचनासाठी खूप चांगला उपयोग होतो. तुळशीचं बी आणि विड्याचं पान एकत्रित खाल्ल्यानंही अनेक आजारांवर गुणकारी ठरतं.

विड्याचं पान व तुळशीचं बी एकत्र खाल्ल्यानं पचनाच्या आजारांसोबतच अनेक आजार बरे होतात. गाझियाबादमधले आयुर्वेदाचार्य राहुल चतुर्वेदी यांनी तुळशीचं बी व विड्याचं पान एकत्रित खाल्ल्यानं होणारे उपयोग सांगितले आहेत.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्तीचं महत्त्व सर्वांना कळलं आहे. विड्याचं पान व तुळशीचं बी यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती (Boost Immunity) वाढते व अनेक आजारांपासून दूर राहणं शक्य होतं.

सर्दी-खोकला जातो

सर्दी-खोकल्यावर विड्याचं पान व तुळशीचं बी खूप गुणकारी ठरतं. विड्याच्या पानांमुळे डोकेदुखी कमी होते. घसा खवखवणं व कफ कमी करण्यासाठी तुळशीच्या बीचा उपयोग होतो. यामुळे सर्दी-खोकला कमी होण्यासाठी (Helps Preventing Cough And Cold) विड्याचं पान व तुळशीचं बी एकत्र खावं.

हे वाचा – निरोगी आरोग्यासाठी Home Remedies करतील मदत, बदलत्या हवामानात ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मुखस्वास्थ्यासाठी फायदेशीर

मुखदुर्गंधी कमी करण्यासाठी विड्याची पानं खाल्ली जातात. या पानांमधली रसायनं तोंडातले बॅक्टेरिया नाहीसे करतात. यामुळे तोंडाचा वास कमी (Mouth Odor) होतो. तोंडातून वास येणं किंवा रक्त येण्याची समस्या असेल, तर एक महिना विड्याची पानं व तुळशीचं बी एकत्र चावून खावं. यात लवंग किंवा वेलचीही घालू शकता. यामुळे तोंडाला वास येणं व रक्त येण्याची समस्या दूर होईल.

शारीरिक क्षमता वाढवते

विड्याच्या पानांमध्ये शारीरिक क्षमता वाढवण्याचा गुणधर्म असतो. यामुळे पुरुषांच्या शरीरातलं स्पर्मचं प्रमाण व त्यांचा दर्जा या दोन्ही गोष्टी सुधारतात. अशक्तपणा वाटत असेल, तर आहारात नियमितपणे विड्याची पानं व तुळशीच्या बीचा समावेश करावा.

हिरड्यांची सूज कमी होते

विड्याची पानं व तुळशीचं बी हिरड्यांची सूज कमी करतात. त्यातल्या अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सूज आणि गाठ कमी होते. याचं नियमित सेवन फायदेशीर ठरतं.

पचन सुधारतं

तुळशीचं बी व विड्याची पानं एकत्र खाल्ल्यानं लाळग्रंथी पूर्ण कार्यान्वित राहतात. या ग्रंथींमुळे अन्नाचं विघटन सुरळीतपणे होतं. याचा फायदा अपचन, गॅसेस दूर करण्यासाठी होतो. तसंच गॅस्ट्रिक अल्सर कमी करण्यासाठीही याची मदत होते.

हे वाचा – तुमच्या ही हाता-पायाला मुंग्या येतात का? मग ‘ही’ गोष्ट असू शकते कारणीभूत

जेवण झालं की पान खायला अनेकांना आवडतं. जेवणानंतर पान खाल्ल्यानं अन्नाचं पचन (Improves Digestion) होतं. पानासोबत सुपारी, कात, चुना हेदेखील अनेकांना आवडतं. यामध्ये तुळशीचं बी घातलं तर ते पान नक्कीच अधिक आरोग्यदायी ठरेल. तुळशीचं बी व विड्याचं पान यांचे अनेक औषधी उपयोग आहेत. त्यांच्या नियमित सेवनानं तोंडाच्या, पोटाच्या समस्या दूर होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News