22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Keratine is important not only for hair but also for health eat this keratin rich food for healthy body in marathi rp


मुंबई 09 सप्टेंबर : अनेक लोकांना असं वाटतं की, केराटिन हे फक्त केसांशी संबंधित आहे. केराटिन हे एक प्रकारचे प्रथिन आहे जे केस, त्वचा आणि नखांमध्ये आढळते. हे प्रथिन त्वचेची रचना टिकवून ठेवण्यास मदत करते, जखम बरी करते आणि केस आणि नखे निरोगी बनवते. केसगळती रोखण्यासाठी, नखांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्वचा उजळ राखण्यासाठी केराटिन सप्लिमेंट्सचा वापर केला जातो. हे प्रोटीन शरीराला निरोगी बनवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी अनेक लोक सप्‍लीमेंट्स स्वरूपात केराटिन खातात. परंतु, त्याची गरज आपल्या घरातील अनेक आरोग्यदायी पदार्थांद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. जाणून घेऊया केराटिन समृद्ध (Keratin Rich Foods) आहाराबद्दल.

अंडी –

अंडी खाल्ल्याने नैसर्गिकरित्या केराटिन उत्पादनास चालना मिळते. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, बायोटिन हा केराटिनचा सर्वात मोठा स्रोत आहे. उकडलेल्या अंड्यामध्ये 10 mcg किंवा 33 टक्के दैनंदिन पोषक घटक असतात. याशिवाय एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असते. अंडी नियमित सेवन केल्याने शरीराला सेलेनियम, रिबोफ्लेविन आणि जीवनसत्त्वे ए आणि बी सारखे पोषक घटक मिळू शकतात.

कांदा –

केसांच्या निरोगी वाढीसाठी अनेकजण कांद्याचा रस वापरतात. कांदा केवळ अन्नाला चविष्ट बनविण्यास मदत करत नाही तर केराटिन उत्पादनास चालना देण्यासही मदत करतो. ही एलियम भाजी अँटिऑक्सिडंट्सचा मुख्य स्त्रोत आहे. ती फक्त केसांसाठीच नाही तर शरीरासाठीही महत्त्वाची आहे.

सॅल्मन –

सॅल्मन फिशमध्ये केराटिन भरपूर प्रमाणात असते. हा बायोटिनचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. हा फिश खाण्यास जितका स्वादिष्ट असतो तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. सॅल्मनमध्ये उच्च प्रथिने तसेच फायबर असतात जे पचनास मदत करतात. तसेच हृदय निरोगी ठेवण्याचे काम करतात.

हे वाचा – ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

रताळी –

रताळ्यामुळे केराटिन उत्पादनास चालना मिळते. त्यामध्ये प्रोविटामिन ए कॅराडेनॉइड्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील संक्रमणांशी लढण्यास मदत करू शकते. रताळ्याचे सेवन त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हे वाचा – डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News