23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Relationships are you getting emotionally away from your partner know those 5 sign rp gh


नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : समविचारी किंवा आवडी-निवडीसारख्या असणाऱ्या व्यक्तींचं नेहमी एकमेकांशी पटतं. हल्ली नात्यांमध्ये एकत्र राहणाऱ्या (Relationship) स्त्री-पुरूषांचंही असंच काहीसं आहे. दीर्घकाळ हे नातं टिकलं तर उत्तमच. पण या नात्यामध्ये प्रामाणिकपणा (Honesty) जपला गेला पाहिजे, अशी अपेक्षा दोघे एकमेकांकडून करत असतात. याच कारणामुळे ते भावनिकदृष्ट्या जोडले गलेले (Emotionally Connect) असतात. पण कालांतराने काही कारणांवरून बेबनाव झाल्यास पार्टनर इमोशनली दूर होऊ लागतात. यात दोघांकडून एकमेकांना फसवलं जाण्याची शक्यताही असते. अतूट आणि अढळ नात्यात ज्यावेळी अंतर येऊ लागतं (Gap In Relationship) तेव्हा ही बाब समजणं दोघांसाठीही कठीण होऊन बसते. नात्यात दुरावा निर्माण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. यातील महत्त्वाच्या बाबींचा उहापोह केल्यास यामागील कारणं शोधता येतील.

एकमेकांना वेळ न देणं

स्टाईलक्रेसच्या माहितीनुसार, रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या जोडप्याचं भावनिक नातं निर्माण झालेलं असतं. ते उठ-बैस, खाण्यापिण्यासह सर्वकाही गोष्टी एकत्रच करतात. परंतु, अचानक या गोष्टी बंद झाल्या तर नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं समजावं. पार्टनरपासून तुम्ही दूर जात आहात त्याचा हा एक मोठा संकेत असू शकतो.

अडचणीच्या काळातही तुमच्याकडे दुर्लक्ष –

भावनिकदृष्ट्या पार्टनरशी जोडले गेल्यानंतर तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तरी तुमच्या पार्टनरला ही बाब न सांगताही हावभावावरून कळत असते. पण ते कळत असतानाही पार्टनर त्यात रस घेत नसेल तर आणि तुमच्या अडचणींशी काही देणं-घेणं नसल्यासारखं वागत असेल तर पार्टनर तुमच्यापासून इमोशनली दूर जात असल्याचं स्पष्ट होत असतं.

पार्टनरकडून प्रोत्साहन मिळत नाही –

समविचारी असल्यानं स्त्री-पुरूष नात्यामध्ये एकत्र येतात. यात दोघांनी वेळोवेळी एकमेकांना प्रोत्साहन देणं आवश्यक असतं. पण कालांतराने पार्टनर प्रोत्साहित करत नसेल आणि पाठिंबा (Support) देत नसेल तर नात्यात दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते. आपण पार्टनरपासून भावनिकदृष्ट्या दूर जात असल्याचा हा सुद्धा एक संकेत असू शकतो.

हे वाचा – भारतातील खडतर प्रवास बाईकने पूर्ण करणारी पहिली तरुण मुलगी म्हणते..

एकमेकांशी नातं घट्ट असणं गरजेचं –

जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना भरपूर वेळ देतात तेव्हा नातं वृद्धिंगत होत असतं. पण तुमचा पार्टनर तुमच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला वेळ देत असेल त्याच्याशी गप्पा-गोष्टी (Chating) करत असेल तर तो तुमच्यापासून दूर जात असल्याचं स्पष्ट दिसू लागतं.

हे वाचा –सोशल मीडियावर भावनेच्या आहारी जाणं पडेल महागात, तरुणांनी घ्यायला हवी ‘ही’ काळजी

त्रयस्थ व्यक्तीसाठी वाद घालणं –

नातं टिकवण्यासाठी समजुतदारपणा (Understanding) असणं फार महत्त्वाचं असतं. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीसाठी दोघांमध्ये सतत वाद, भांडणं होत असतील तर तुमचा पार्टनर इमोशनली तुमच्यापासून दूर जात असल्याचा हा महत्त्वाचा संकेत आहे.

नात्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये एकमेकांवर विश्वास, प्रेम, प्रामाणिकपणा, समंजस्य असणं फार महत्त्वाचं असतं. वरील पाच संकेतांवरून तुम्ही पार्टनरपासून दूर जात आहात की नाही, हे समजण्यासाठी मदत होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News