27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

चहावाल्याच्या प्रेमात पडली MBBS डॉक्टर, लग्नही केलं; तिनं त्याच्यात काय पाहिलं? कसं जुळलं? पाहा हा Love Story Video


कराची, 08 सप्टेंबर :  सामान्यपणे लग्न म्हटलं की आपल्या तोलामोलाचा जोडीदार शोधला जातो किंवा निवडला जातो. म्हणजे आपल्या आयुष्याचा जोडीदाराचं आपल्या इतकं शिक्षण असावं, आपण कमावतो तितकंच त्यानेही कमावयाला हवं, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. त्यात ती महिला असेल तर तिला आपला जोडीदार आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त पैसे कमावणाराच हवा असतो. असं असताना पाकिस्तानातील एक असं कपल चर्चेत आलं आहे, ज्याने प्रेम असेल तर या कशाचीच गरज नाही, प्रेमासमोर हे सर्वकाही क्षुल्लक आहे हे दाखवून दिलं आहे. एका एमबीबीएस डॉक्टर महिलेने चक्क एका चहावाल्याशी लग्न केलं आहे.

डॉक्टर किश्वर आणि चहावाला शाहाजाद हे कपल सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांची अनोखी लव्हस्टोरी तुफान व्हायरल होतो आहे. ओकारातील दीपालपूरमध्ये राहणारं हे कपल. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं. मेरा पाकिस्तान या युट्यूब चॅनेलवर या कपलचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जिथं त्यांनी आपली अजब प्रेमाची गजब कहाणी सांगितली आहे.

हे वाचा – Love story : शेजारी बसली आणि बनली गर्लफ्रेंड; कपलची ‘बसवाली लव्ह स्टोरी’ चर्चेत

डॉक्टर किश्वर ज्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होती, तिथं शहजाद चहावाला म्हणून आणि साफसफाईचं काम करायचा.  डॉ. किश्वरने एकदा शहजादचा फोन नंबर मागितला आणि दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एमबीबीएससारखं उच्च शिक्षण घेणाऱ्या डॉ. किश्वरनेच शहजादला प्रपोज केलं. एक दिवस शहजादला तिने आपल्या रूममध्ये बोलावलं आपलं प्रेम व्यक्त केलं. डॉक्टर असलेल्या किश्वरने प्रपोज केल्याने शहजादलाही धक्का बसला. त्याला तापही आला होता. पण त्यालाही ती आवडत होती. त्यामुळे अखेर त्या दोघांनी लग्न केलं.

” isDesktop=”true” id=”758163″ >

डॉक्टर किश्वर आपल्या नवरा शहजादचं खूप कौतुक करते. ती सांगते, “शहजाद आपल्याला क्लिनर किंवा चहावाला वाटत नाही. त्याच्या वागणुकीवर मी फिदा झाले”. तर शाहजादला म्हणतो, “डॉ. किश्वर त्याला खूप खूप सुंदर वाटायची. पण ती आपल्या प्रेमात पडेल, आपल्याशी लग्न करेल असा विचारही मी कधी केला नव्हता. पण नशीबात जे लिहिलं होतं, ते घडलं”

हे वाचा – लहान वयातच तुमचं मुलं प्रेमात पडलंय? ‘या’ पद्धतीनं हाताळा नाजूक परिस्थिती

आता डॉक्टर आणि चहावाल्याचं लग्न हे अनेकांच्या पचनी न पडणारं आहे. त्यामुळे लग्नानंतर किश्वरला रुग्णालयातील नोकरी सोडावी लागली, कारण त्यांना समाजाकडून खूप ऐकावं लागायचं. आता ते स्वतःचं क्लिनिक खोलण्याचा विचार करत आहेत. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना अनेकांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News