27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

मऊ, लुसलुशीत पोळ्या कशा कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स – News18 लोकमत


नवी दिल्ली, 8 सप्टेंबर: स्वयंपाक (Cooking) करणं ही कला असली, तरी ती प्रयत्नपूर्वक शिकून आत्मसात करता येते. एखाद्याच्या हातची चव त्या जेवणात उतरते तेव्हा ते जेवण खूपच गोड लागतं. प्रत्येक व्यक्तीला तसंच नाही, पण किमान चांगला आणि चवीचा स्वयंपाक करणं शिकून जमू शकतं. त्यातही भाजी, आमटी, कोशिंबिरी, चटण्या करण्याची प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आणि चव असते; मात्र गव्हापासून तयार होणारी पोळी किंवा चपाती सगळीकडे सारख्याच पद्धतीनं केली जाते. तरीही काहींनी केलेल्या पोळ्या वातड, काहींनी केलेल्या काळपट, लालसर तर काहींनी केलेल्या कच्च्या आणि जाड होतात. त्यामागे कणीक मळण्यापासून ते पोळी भाजण्यापर्यंतच्या प्रक्रियेत होणारी गडबड कारणीभूत असते. काही सोप्या टिप्स (Tips For Making Soft Rotis) लक्षात ठेवल्या तर पोळ्या मऊ, लुसलुशीत आणि उत्तम करणं जमू शकतं.

पीठ मळताना तूप वापरावं

अनेक घरांमध्ये कणीक मळताना त्यात मीठ आणि पाणी घातलं जातं. काही ठिकाणी तेलही घालतात. तेल घातल्यानं पोळ्या मऊ होतात असं म्हणतात; मात्र काही वेळा तेलाचा वास पोळीला येऊ शकतो. त्यासाठी पीठ मळताना तूप (Use Ghee) वापरा. यामुळे पोळ्यांना वासही येणार नाही आणि त्या जास्त वेळ मऊ राहतील.

कणीक चाळून घ्यावी

कणीक दळताना त्यात थोडा कोंडाही असतो. त्यात फायबर्स असल्याने काही जण कणीक दळून आणल्यावर ती न चाळताच त्यापासून पोळ्या करतात; मात्र यामुळे पोळी कडक किंवा वातड होण्याचा धोका असतो. त्यामुळे दळलेली कणीक शक्यतो चाळून मगच पोळ्या कराव्यात. त्यामुळे पोळी जास्त वेळ मऊ राहील.

हेही वाचा –  Superfood : आता निरोगी राहणे सहज होईल शक्य; फक्त रात्री जेवणानंतर खा हे दोन पदार्थ

पीठ घट्ट मळू नये

पोळीसाठी पीठ मळताना ते खूप घट्ट मळू नये. कारण पीठ जितकं घट्ट असेल, तितकी पोळी कडक होते. त्यामुळे आवश्यकतेनुसार हळूहळू पाणी घालून पीठ खूप घट्टही नाही व खूप सैलसरही नाही (Make A Soft Dough) असं मळून घ्यावं.

भिजलेली कणीक कापडाने झाकावी

पीठ भिजवल्यावर कणीक तिंबावी लागते. काही काळ कणीक व्यवस्थित भिजण्यासाठी कणकेचा गोळा झाकून ठेवावा. शक्यतो कापडाने (Cover Dough With Cloth) झाकावा. म्हणजे कणीक वाळणार नाही व पोळ्या मऊ होतील.

पोळ्या काळ्या का होतात?

कणीक भिजवून जास्त वेळ तशीच ठेवून दिल्यास पोळ्या काळ्या होतात. तसंच लाटलेली पोळी पोळपाटावर काही वेळ तशीच ठेवली तरीही ती काळी पडते. म्हणून कणीक भिजवल्यावर 10 मिनिटांनी लगेचच पोळ्या कराव्यात. तसंच पोळी लाटल्यावर व भाजल्यावर जास्तीचं पीठ झटकून टाकावं. म्हणजेही पोळी काळी दिसणार नाही.

छान गोल व लुसलुशीत पोळ्या करणं हे फार अवघड काम नाही. अशा काही छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं व नियमित प्रयत्न केले तर हे सहज जमू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News