22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Digital prime time life 25 in laws and husband not like when i visit my parents relationship expert tips mhpl


“माझ्या लग्नाला 6 महिनेच झाली आहे. नवरा, सासू-सासरे तसे चांगले आहेत. पण एका गोष्टीचा मला खूप त्रास होतो. माझ्या सासरची मंडळी मला माहेरी जाऊ देत नाहीत. माझ्या आईवडिलांना फार भेटू देत नाहीत. मी आई-वडिलांपासून कधीच दूर राहिले नाही. लग्नानंतर मला त्यांची खूप आठवण येते. त्यामुळे आठवड्यातून किंवा 15 दिवसांनी एकदा मला त्यांना भेटण्याची इच्छा असते.”

“पण सासूच्या मते, असं सतत माहेरी जाणं किंवा आईवडिलांना भेटणं बरं नव्हे. माझे सासरे आणि नवराही तिच्या मताशी सहमत आहे. मी काय करू?”

हे वाचा – Life@25 : ‘घर आणि माझ्यापेक्षा बायको ऑफिस आणि मित्रमैत्रिणींनाच जास्त वेळ देतेय

मानसशास्त्रज्ञ  डॉ. राजेंद्र बर्वे, “लग्न फक्त दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंबाना जोडतं. त्यामुळे जसं तुम्हाला तुमच्या नव्या कुटुंबात जुळवून घ्यायला वेळ लागतो. तसं कुटुंबांनाही एकमेकांशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे तुमच्या सासरची मंडळी तुम्हाला तुमच्या माहेरी जाऊ देत नसावेत.”

“तुमचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आठवण येणं. त्यांना भेटावसं वाटणं साहजिकच आहे. अशात तुमच्या सासू सासर्‍यांना तुम्ही तुमच्या आईवडिलांना भेटलेलं आवडत नसेल तर तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे मी समजू शकतो.”

हे वाचा – Life@25 : ‘आई आणि बायको खूप भांडतात; त्यांच्यातील वाद कसा सोडवू?’

“तुमचे सासू- सासरे म्हणतात तसं तुम्ही तुमच्या आईवडिलांना भेटणं चुकीचं नाही. तुम्ही काहीही चूक करत नाही आहात. पण त्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमच्या नवर्‍याशी बोला. तुम्हाला या कुटुंबात रमायला थोडा वेळ जाईल हे त्याला सांगा. तुमच्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करा. तुमच्या अपेक्षा सांगा. त्यानंतर तुमच्या सासू-सासर्‍यांशी बोला. तुम्हीही काही वेळ या कुटुंबात घालवा. त्यांना समजून घ्या. म्हणजे त्यांना समजावणं तुम्हाला सोपं जाईल.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News