22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Effects of eating food from nonstick utensils cause health problem mhpj


मुंबई, 7 सप्टेंबर : स्वयंपाकघर मॉड्युलर होत असल्याने येथे वापरण्यात येणारी भांडीही नॉनस्टिक होत आहेत. यामध्ये, स्वयंपाक आणि त्यानंतरची साफसफाई करणे देखील सोपे आहे. स्वयंपाकासाठी तेलही कमी लागते. नॉनस्टिकचेही अनेक तोटे आहेत. याचा वाईट परिणाम हळूहळू तुमच्या आरोग्यावर होत आहे. आज आम्ही तुम्हाला नॉनस्टिक भांड्यांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देणार आहोत.

या भांड्यांचा धूर असतो विषारी

पीएफओए नावाच्या कार्सिनोजेनिक रसायनापासून नॉन-स्टिक भांडी बनवली जातात. प्रत्येक वेळी ही भांडी गरम केल्यावर ते एक विषारी वास सोडतात ज्यामुळे तुम्ही आजारी पडता. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य पुन्हा पुन्हा एखाद्या संसर्गाला बळी पडत असाल, तर नॉन-स्टिक भांडी हे त्याचे कारण असू शकते. म्हणजेच स्वयंपाकघरातील तुमचा सर्वात चांगला मित्र हा तुमच्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.

डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी हा आहे भन्नाट उपाय; फक्त घरातील कुंडीत लावा ही झाडं

या आजारांची भीती

सतत बराच वेळ शिजवल्याने किंवा स्टीलचा चमचा वापरल्याने भांड्याच्या वरच्या थराला ओरखडे पडतात. अशा भांड्यात अन्न शिजविणे आणखी वाईट आहे. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. ज्या घरांमध्ये अन्न नॉन-स्टिकमध्ये शिजवले जाते. तेथे फ्लूची लक्षणे सामान्य आहेत. या भांड्यांमधून येणाऱ्या सततच्या धुरामुळे गरोदर महिलांच्या गर्भाच्या मेंदूला कायमचे नुकसान होऊ शकते. महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण कमी होते. या भांड्यांचा सतत वापर केल्याने स्वादुपिंडाचा म्हणजेच पॅनक्रियाचा कर्करोग आणि लिव्हरचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. ज्या भांड्यांचा कोट खरचटला आहे अशा भांड्यांमध्ये खाल्ल्यास कोलायटिस होण्याचा धोका असतो.

सावधगिरी बाळगा

नॉनस्टिक कूकवेअरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यानेही रसायने शरीरात जातात. ते सहजासहजी सुटत नाहीत. संशोधनात असे म्हटले आहे की, या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न खाणे आपण जरी पूर्णपणे सोडले, तरी ही जिद्दी रसायने शरीरातून बाहेर पडण्यासाठी सुमारे चार वर्षे लागू शकतात. मात्र योग्य खबरदारी घेतल्यास नुकसानीचा धोका थोडा कमी होऊ शकतो.

Food for Diabetes : जिभेचे चोचलेही पुरवतील आणि ब्लड शुगरही वाढणार नाही; डायबेटिज पेशंटसाठी 5 चमचमीत पदार्थ

नॉनस्टिक भांड्यात अन्न शिजवताना अशी घ्या काळजी

– सर्वप्रथम, नॉन स्टिक ऐवजी साध्या भांड्यात अन्न शिजवण्याचा प्रयत्न करा.

– खरेदी केल्यानंतर कधीही नॉनस्टिक भांडी थेट वापरू नका. ते स्वच्छ दिसतात परंतु त्यांचा रासायनिक लेप अन्नाद्वारे आपल्या शरीरात पोहोचू शकतो. त्यांना कोमट पाण्याने धुवा आणि मग वापरा.

– भांडी वापरण्यासाठी, एक वेगळा लाकडी चमचा घ्या. स्टीलच्या चमचा चालवल्यास त्यांचा वरचा थर काढून टाकला जातो आणि हानिकारक पदार्थ थेट आपल्या पोटात पोहोचतात.

– भांड्यांच्या कोटिंगची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये स्वयंपाक केल्यानंतर भांडी सिंकमध्ये ठेवण्याऐवजी हाताने धुवावीत. यामुळे ते दीर्घकाळ टिकतात.

– भांड्यांसह वापरलेला लाकडी चमचा पाण्यात भिजवून ठेवू नका. यामुळे ते लवकर खराब होतात. त्यांना एकत्र धुवा आणि बाजूला ठेवा.

– काही वेळा स्वयंपाक करताना भांड्याला काहीतरी चिकटते. त्यांना स्टीलच्या वस्तूने घासून काढू नका, कारण यामुळे नॉनस्टिक लगेच खराब होऊ शकते.

– नॉनस्टिक भांड्यांना आयुष्यमान असते. जर त्यांचे कोटिंग निघत असेल तर ही भांडी ताबडतोब बदलावीत. जुन्या जीर्ण भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने चांगल्या भांड्यांपेक्षा जास्त नुकसान होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News