23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Taking tension mental stress is very dangerous So many serious diseases are caused by it rp gh


नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : तणाव (Stress) महामारीसारखा पसरत आहे. अलिकडे सर्व वयोगटांतील लोक तणावाचा सामना करत आहेत. पर्सनल लाईफपासून (Personal Life) ते प्रोफेशनल लाईफपर्यंत (Professional Life) लोक दररोज तणावाखाली जगत आहेत. दीर्घकाळ तणावामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी काही लोक योगा आणि व्यायामाची मदत घेतात. पण मोठ्या प्रमाणात लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. अतिताण तुमच्या मेंदूला हानी पोहोचवतो आणि तुम्हाला मेंदूसंबंधी आजार होऊ शकतो, हे तुम्हाला माहितीये का? हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. जास्त ताण हा तुमच्या मेंदूचा शत्रू आहे. आज आम्ही तुम्हाला तणावामुळे होणाऱ्या मानसिक समस्यांबद्दल सांगणार आहोत.

तणावामुळे मेंदू संकुचित होऊ शकतो –

जास्त ताण घेतल्याने तुमचा मेंदू संकुचित होऊ शकतो, असं अनेक अभ्यासांमधून समोर आलंय. व्हेरीवेल माईंडच्या अहवालानुसार, तणावामुळे निरोगी लोकांचा मेंदूही संकुचित होऊ शकतो. तणावाचा सर्वांत मोठा परिणाम मेंदूतील भावना, मेटॅबॉलिझम आणि स्मरणशक्तीशीसंबंधित भागावर होतो. दीर्घकाळ तणावामुळे अनेक मानसिक विकार होऊ शकतात. इतकंच नाही तर अनेक प्रकरणांमध्ये मेंदूच्या आकारात आणि संरचनेतही बदल होतो. यामुळे मेंदूवर खोलवर परिणाम होतो आणि तुमच्या स्मरणशक्तीवरही वाईट परिणाम होतो. ज्येष्ठांची स्मरणशक्ती कमकुवत होते.

ब्रेन सेल्स डॅमेज होऊ शकतात –

तणावामुळे मेंदूतील न्यू न्यूरॉन्स डॅमेज होतात. हे न्यूरॉन्स मेमरी, इमोशन्स आणि लर्निंगशी संबंधित असतात. एका अभ्यासात ही बाब समोर आली होती. हा मेंदूचा तो भाग आहे, जिथे नवीन ब्रेन सेल्सचे (Brain Cells) फॉरमेशन होतं. तणावामुळे मानसिक आजाराची समस्या वाढू शकते. यामुळे आपल्या मेंदूमध्ये अनेक अनावश्यक बदल होतात आणि ते मानसिक विकारांचं कारण बनतात. जे लोक आयुष्यात झालेल्या ट्रॉमातून जात असतील त्यांनी तणावाची विशेष काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी जास्त ताण घेणं गंभीर ठरू शकतं.

हे वाचा – भारतातील खडतर प्रवास बाईकने पूर्ण करणारी पहिली तरुण मुलगी म्हणते..

स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते –

बर्‍याचदा तुम्ही अनुभवलं असेल की जेव्हा तुम्ही जास्त तणावाखाली असता तेव्हा गोष्टी लक्षात ठेवणं कठीण होतं आणि त्यामुळे अनेक वेळा तुम्ही योग्य निर्णयही घेऊ शकत नाही. तणावामुळे आपलं शरीर कॉर्टिसॉल हॉर्मोन (Cortisol Hormone ) रिलीज करतं, त्याला स्ट्रेस हॉर्मोनदेखील म्हणतात. या हॉर्मोनचा परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होतो आणि स्मरणशक्ती कमकुवत होते. दीर्घकाळ ताण घेतल्यास स्मरणशक्तीशी संबंधित आजार होऊ शकतात.

हे वाचा –सोशल मीडियावर भावनेच्या आहारी जाणं पडेल महागात, तरुणांनी घ्यायला हवी ‘ही’ काळजी

ताण घेतल्याने शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे स्वतःला अशा आजारांपासून दूर ठेवण्यासाठी ताण न घेणं किंवा वेळीच त्यावर उपचार घेणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News