22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Adding dry fruits powder make milk in this way children like it and get nutrition too mhpj


मुंबई, 6 सप्टेंबर : मुलांच्या संपूर्ण पोषण आणि विकासासाठी मुलांना सर्व पौष्टिक पदार्थ खाऊ घालणे गरजेचे असते. मात्र सध्या बाहेरच्या पदार्थांचं जाळं इतकं पसरलेलं आहे की, मुलांना काहीतरी पौष्टिक खाऊ घालणं खूप अवघड होत चाललं आहे. मुलांना हल्ली पौष्टिकतेपेक्षा चवीसाठी पदार्थ खायचे असतात आणि तेही असे पदार्थ जे त्यांच्यासाठी अजिबात चांगले नसतात. अशावेळी मुलांना आपण दुधामधून अधिकाधिक पोषण देण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र यासाठी तुम्हाला दुधामध्ये आणखी काही गोष्टी टाकाव्या लागतील आणि ते म्हणजे सुका मेवा.

तुम्ही 7 ते 8 महिने वयाच्या बाळांना सुका मेवा खायला देऊ शकता. परंतु मुलं सहसा सुका मेवा खाण्याचा कंटाळा करतात. अशावेळी पेस्ट किंवा पावडरच्या स्वरूपात मुलांना ड्राय फ्रुट दिले जाऊ शकतात. यासाठी सर्व ड्राय फ्रूट्स पॅनमध्ये हलके भाजून घ्या. ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर तयार करून घ्या आणि ती मुलांच्या दुधामध्ये मिसळत जा. अशाप्रकारे मुलांना दिले जाणारे दूध अधिक पौष्टिक आणि संपूर्ण बनते.

दुधात टाकल्या जाणाऱ्या ड्राय फ्रूट्सचे फायदे

बदाम : यामध्ये असलेले फॉस्फरस मेंदू आणि हाडे मजबूत करतात. हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, हेल्दी फॅट्सचा उत्कृष्ट स्त्रोतदेखील आहेत.

Neck Rashes Remedy : बाळाच्या मानेवर वारंवार येतात पुरळ? मग करून पाहा हे 5 घरगुती उपाय

अक्रोड : ओमेगा 3 फॅटी ऍसिडने समृद्ध असलेले अक्रोड मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय त्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंकही भरपूर असते.

पिस्ता : पिस्त्यात जीवनसत्त्व ए, सी, ई, थायामिन, रिबोफ्लेविन, हेल्दी फॅट, प्रोटीन इत्यादी असतात जे निरोगी वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

काजू : काजूमध्ये उच्च पातळीचे अँटी-ऑक्सिडेंट असतात जे डोळ्यांसाठी आवश्यक असतात. याशिवाय यामध्ये असलेली मॅग्नेशियमची उच्च पातळी हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.

तुमचं मूल थोडं मोठं असेल आणि त्याला चावता येत असेल तर तुम्ही त्याच्या दुधामध्ये खालील ड्राय फ्रुटदेखील टाकू शकता.

खजूर : खजूरामध्ये कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त, लोह, जीवनसत्त्व ए, बी6, के इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. जे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप महत्वाचे आहेत.

मुलांचं अंगठा चोखणं पडू शकतं महागात; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती

मनुका : मनुक्यामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात. जे दातांवरील जंत रोखतात. याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि गॅसची समस्या दूर होते.

अंजीर : अंजीरामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच लिव्हरही चांगले राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News