22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Baby born without baby bump woman pregnant no pregnancy sypmtpms back to work after delivery mhpl


लंडन, 07 सप्टेंबर : प्रेग्नन्सी म्हटलं की मासिक पाळी चुकणं, मळमळणं, उलटी होणं अशी लक्षणं सुरुवातीला दिसतात. काही आठवड्यांनी पोटाचा आकार वाढतो आणि बेबी बम्प दिसू लागतं. पण एका तरुणीच्या बाबतीत प्रेग्नन्सीची अशी कोणतीच लक्ष न दिसता तिने अचानक बाळाला जन्म दिला आहे. ऑफिसमध्ये असताना तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या म्हणून ती तिथून निघाली आणि तिने अचानक बाळला जन्म दिला. (Baby born without pregnancy symptoms).

23 वर्षांची टिकटॉक युझर ब्रिटने आपल्या प्रेग्नन्सीचा विचित्र अनुभव शेअर केला आहे. टिकटॉकवर तिने आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने सांगितल्यानुसार आपण प्रेग्नंट आहोत याची माहिती तिलाही नव्हती. तिचं वजन 49 ते 52 किलोग्रॅम दरम्यान होतं. पीरियड्स तसेही अनियमित होते, त्यामुळे एखाद वेळेस पीरियड्स न आल्यास आपण प्रेग्नंट असू शकतो, अशी शंका तिला आली नाही. तिने व्हिडीओत आपले काही फोटोही दाखवले आहेत, ज्यात तिचं बेबी बम्प बिलकुल दिसत नाही आहेत.

ऑफिसमध्ये अचानक तिची तब्येत बिघडली. तिच्या पोटात कळ आल्यासारखं होत होतं, गॅसची लक्षणं होती. त्यामुळे ऑफिसवरून निघून ती डॉक्टरांकडे गेली. तिथं तिला ती प्रेग्नंट असल्याचं समजलं आणि धक्कादायच बसला. तिच्या प्रेग्नन्सीला सात महिने पूर्ण झाले होते. प्रेग्नन्सीच्या साडेसात महिन्यांनंतर तिने एका मुलीला जन्म दिला.

हे वाचा – ना बेबी बम्प, ना प्रेग्न्सीचं लक्षण; पोटात दुखू लागलं आणि 20 वर्षांच्या तरुणीने अचानक दिला बाळाला जन्म

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार ब्रिटने सांगितलं की,  हॉस्पिलमधून डिस्चार्ज होताच ती ऑफिसला गेली. रात्री दोनच्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला. सकाळी 6 वाजता तिला डिस्चार्ज देण्यात आला. सकाळी 10.30-11 ला तिचं ऑफिस होतं. आपल्या ऑफिसच्या वेळेत ती कामावर पोहोचली.

ब्रिटने मॅनेजरला सांगितलं की काही दिवस ती ऑफिसला येऊ शकत नाही. तिचं महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे शिफ्टमध्ये ती येऊ शकत नाहीत. ब्रिटच्या मॅनेजरने सांगितलं की, तिला बरं वाटत नव्हतं. म्हणून ती हॉस्पिटलमध्ये गेली पण तिच्या डिलीव्हरीबाबत काही सांगितलं नव्हतं.

हे वाचा – 15 वर्षांच्या मुलाने प्रायव्हेट पार्टसोबत केला नको तो खेळ; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

अचानक डिलीव्हरीझाल्याने तिला धक्का बसला. सर्वांना सत्य सांगण्याती हिंमत तिच्यात नव्हती.  हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेक युझर्सनी ब्रिटला सपोर्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News