23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Digital prime time life 25 wife spend more time in office than home and me relationship expert tips mhpl


“आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली. घरात आम्ही दोघंच. अद्याप आम्ही मुलांचं प्लॅनिंग केलेलं नाही. आम्ही दोघंही कमावतो, त्यामुळे घरातील प्रत्येक कामासाठी हेल्पर्स आहेत. याचा परिणाम म्हणजे माझी बायको घरात फार कमी वेळ असते. तिला घरातील कामं आवडत नाहीच पण ती घरापेक्षा ऑफिसला आणि माझ्यापेक्षा मित्रमैत्रिणींना जास्त वेळ देते. सकाळी लवकर निघून जाते आणि रात्री उशिरा घरी येते. तोपर्यंत माझं जेवण वगैरे झालेलं असतं. झोपताना फक्त १०-१५ मिनिटंच आमच्यात बोलणं होतं. सुट्टीच्या दिवशीही ती मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाते”

“यावरून आमचं बऱ्याचदा भांडणही झालं आहे. पण लग्नाच्या काही कालावधीनंतर असा टप्पा येतोच. ज्यावेळी तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं असतं, असं ती सांगते. ती म्हणते ते बरोबर आहे का? आमच्या दोघांमधील दुरावा मिटून जवळीक वाढावी यासाठी काय करायला हवं?”

तज्ज्ञांचा सल्ला – “लग्न म्हणजे दीर्घकालीन वचन, रिलेशनशिप. दोन व्यक्तींमधील गुंतवणूक. ज्यात भावना, वेळ गुंतलेला असतो. यामध्ये बऱ्याच टप्प्यांमधून जावं लागतं आणि कपलला या परिस्थितीचा एक टिम म्हणून सामना करावा लागतो. तुम्ही मुलांचं प्लॅनिंग केलं नाही, तुमची बायको तुम्हाला वेळ देत नाही, तुमच्याशी नीट बोलत नाही, घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त वेळ असते, सुट्टीच्या दिवशीही घराबाहेरच असते. यावरून तुम्ही भांडलातही यावरूनच ही संपूर्ण परिस्थिती तुमच्याशाठी किती तणावपूर्ण आहे हे दिसून येतं”

हे वाचा – Life@25 : ‘आई आणि बायको खूप भांडतात; त्यांच्यातील वाद कसा सोडवू?’

“तिच्या मते प्रत्येकाच्या वैवाहिक आयुष्यात असा टप्पा येतो. पण तसं नाही. सर्वांच्याच बाबतीत लग्नानंतर असं घडत नाही. तिला नेमकं काहीतरी खटकत असावं आणि ते काय ते शोधून काढा. तुमच्या रिलेशनशिपमधून तिच्या अपेक्षा काय आहेत, ते समजून घ्या. त्यानंतर तिला तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जा आणि तिथं तुम्ही सध्या ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीबाबत व्यक्त व्हा. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तिची साथ हवी आहे हे तिला सांगा”

हे वाचा – Life@25 : सतत तिच्या एक्स-शी माझी तुलना; बायकोच्या मनातून त्याला बाहेर कसं काढू?

“हॅप्पी रिलेशनशिपसाठी तुम्ही एक टिम म्हणून एकत्र येऊन काम करायला हवं, त्यावर मेहनत घ्यायला हवी. तरी समस्या सुटली नाही तर समुपदेशकांची मदत घ्या”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News