27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Eat eggs with these foods to reduce obesity, you will lose weight quickly mhpj


मुंबई, 07 सप्टेंबर : सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात अनियोजित जीवशैली आणि अनियमित आहार यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. लठ्ठपणा वाढल्यानंतर मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, ट्रिपल वेसल डिसीज आणि कोरोनरी आर्टरी डिसीज यांसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे त्यावर वेळेत नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अंडी कशी फायदेशीर ठरतात हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. काही खास पद्धतीने अंडी खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे त्याला सुपरफूड म्हटले जाते. अनेक जण नियमित आहारात अंड्यांचा समावेश करतात. अंड्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आढळतात. उकडलेले अंडे, ऑम्लेट, भुर्जी, अंडी करी अशा अनेक प्रकारे अंडी खाल्ली जातात. परंतु तुम्ही 3 गोष्टींसोबत अंड्याचे पदार्थ बनवले तर ते तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते.

या गोष्टींसोबत बनवा अंड्याचे पदार्थ

शिमला मिरची : अनेक रेस्टॉरंटमध्ये अंड्या शिमला मिरचीने सजवले जाते. शिमला मिरचीसोबत अंडी खाल्ल्यास ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. आपण घरी देखील अंडी शिमला मिरचीसोबत बनवून खाऊ शकता. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे चरबी कमी करण्यास मदत करते. रोज अंडी आणि शिमला मिरची एकत्र खाल्ल्यास वजन कमी करणे सोपे होईल.

Kartula benefits : ब्लड प्रेशर असो वा डायबेटिज; कंट्रोलमध्ये ठेवते ही काटेदार भाजी

काळी मिरी : उकडलेल्या अंड्यांवर किंवा ऑम्लेटवर तुम्ही अनेकदा काळी मिरीची पावडर शिंपडली असेल. यामुळे अंड्याची टेस्ट तर वाढतेच, शिवाय ते अधिक आरोग्यदायी बनते. काळी मिरीमध्ये पिपेरिन नावाचे कंपाउंड आढळते. त्यामुळे तिची चव कडू असते. हा मसाला पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी करण्यास मदत करतो.

डायबिटीज असली तरी बिनधास्त खाऊ शकता ‘ही’ 5 फळं; मिळतात ‘इतके’ आरोग्य फायदे

खोबरेल तेल : आपल्यापैकी अनेकांना खोबरेल तेलाच्या फायद्यांविषयी माहिती असेलच. यात सॅच्युरेटेड फॅट नगण्य प्रमाणात असतात. खोबरेल तेलात ऑम्लेट शिजवल्यास वजन कमी करण्यास मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News