3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

How to serve pitru paksha thali, what should be the dishes in Pitrupaksha’s plate? mhpj


मुंबई, 7 सप्टेंबर : पितृपक्षातील पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्याच्या 15 दिवसांच्या कालावधीत लोक पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्ध विधी करतात. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत असतो. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

पितृपक्षाचे महत्त्व

पितृपक्षात पिंडदान, तर्पण केले जाते. काही ठिकाणी ब्राह्मणांना भोजनही केले जाते. यामुळे पितर प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात. पितृ पक्षामध्ये तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान हे 16 दिवसांच्या कालावधीमध्ये केले जातात. पितृपक्षात जे पितरांना तर्पण आणि पिंड दान अर्पण करत नाहीत. त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो. त्यांच्या घरात काही सतत कलह आणि अनुचित घटना घडतात.

Pitru Paksha 2022: पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये? हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे

पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय असावे?

आपण आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, आलू वडी आणि कांदा भाजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी दही-भात, कुरडई, पापड असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भजी, बटाटा भजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याची भजी यांचा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्व असते. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतींनुसार बदलतात. काही ठिकाणी कांडा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो.

पितरांचे ताट वाढताना घ्या ही काळजी

– पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे.

– ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे.

– सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्या.

– ताटाच्या मधोमध भात-वरण ठेवावे. तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी.

– कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे.

संध्याकाळच्या वेळेस झोपू नये असं का म्हणतात? ही आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

यंदा या तारखांना केले जाईल श्राद्ध

– पौर्णिमा श्राद्ध भाद्रपद, शुक्ल पौर्णिमा : 10 सप्टेंबर 2022

– प्रतिपदा श्राद्ध, अश्विन, कृष्ण प्रतिपदा : 11 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण द्वितीया : 12 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण तृतीया : 13 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण चतुर्थी : 14 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण पंचमी : 15 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण षष्ठी : 16 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण सप्तमी : 17 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण अष्टमी : 18 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण नवमी : 19 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण दशमी : 20 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण एकादशी : 21 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण द्वादशी : 22 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण त्रयोदशी : 23 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण चतुर्दशी : 24 सप्टेंबर 2022

– अश्विन, कृष्ण अमावस्या : 25 सप्टेंबर 2022

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News