22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Sudden mood changing can be a symptom of diabetes may affect mental health mhpj


मुंबई, 07 सप्टेंबर : मधुमेह हा एक असा आजार आहे जो माणसाचे शरीर हळूहळू नष्ट करतो. त्याला सायलेंट किलरही म्हणता येऊ शकते. बहुसंख्य लोकांना मधुमेह होण्यापूर्वी काही लक्षणे दिसतात. परंतु त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लोक या आजाराला बळी पडत आहेत. मधुमेहाचा आपल्या शरीरावरच नव्हे तर मनावरही खोलवर परिणाम होतो. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. हाय ब्लड शुगरमुळे ताणतणाव आणि नैराश्य येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला मधुमेह आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंध सांगणार आहोत.

मधुमेहामुळे बदलतो मूड

काही लोकांचा मूड अचानक बदलतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होऊ लागते. याला मूड स्विंग असे म्हणतात. अनेक कारणांमुळे मूड बदलू शकतो, परंतु बहुतेक मधुमेही रुग्णांमध्ये हे रक्तातील साखरेची पातळी बदलल्यामुळे होते. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, रक्तातील साखरेची पातळी जास्त किंवा कमी झाली की मूड स्विंग सुरू होतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी खाण्यापूर्वी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 80 ते 130 ML/DL राहील याची काळजी घ्यावे. तसेच खाल्ल्यानंतर काही तासांनी ती 180 ML/DL पेक्षा जास्त नसावी. परंतु ती कमी-जास्त होत असेल तर त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतो आणि तणावही वाढतो.

Brain And Heart : हृदय कमकुवत असणाऱ्यांचा मेंदू लवकर होतो वृद्ध! असं आहे हार्ट आणि ब्रेनचं कनेक्शन

ही लक्षणे दिसतात

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी किंवा जास्त होते तेव्हा तुमच्या भावना वेगाने बदलतात. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यावर गोंधळ, अस्वस्थता, चिडचिड, थकवा, जास्त घाम येणे, चिडचिड आणि जास्त भूक लागणे अशी लक्षणे दिसतात. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तेव्हा अस्वस्थता, तणाव, राग, थकवा, आळस, उदासपणा, मूर्च्छा ही लक्षणे दिसतात. दोन्ही परिस्थितींचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि ही लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हसणं शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर; काय सांगतात संशोधक?

मधुमेह आणि तणाव यांच्यातील संबंध

जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी नसते तेव्हा ती तणावग्रस्त होते. मधुमेहामुळे तणाव अधिक तीव्र होऊ शकतो. या रोगाचा तणावावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि रक्तातील साखरेची पातळी बदलल्याने अनेक महिने तणाव टिकून राहतो. दीर्घकाळ तणावामुळे चिंता आणि नैराश्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधीकधी मधुमेहामुळे स्मरणशक्तीतही फरक पडतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News