25.2 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Teach children these 5 points through ganpati bappa stories to become successful in life mhpj


मुंबई, 6 सप्टेंबर : देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. हा गणेशोत्सव दरवर्षी 10 दिवस चालतो. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी लोक काय काय करतात? देवाचा आवडता पदार्थ, मिठाई. फळे, फुले अर्पण केली जातात. गणेशोत्सवाची सर्वांनाच प्रतीक्षा असते. दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. गणपतीला शिक्षण, बुद्धिमत्ता, ज्ञान आणि कला यांचे प्रतीक मानले जाते. गणेश चतुर्थीच्या या पवित्र सणाला तुम्हीही गणपतीच्या जीवनातील गुण शिकवून तुमच्या मुलाला हुशार बनवू शकता. हे गुण कोणते आहेत आणि ते मुलांना हुशार कसे बनवू शकतात याबद्दल जाणून घेऊया.

एखाद्याचे दोष स्वीकारण्याची क्षमता

ChampTree.com च्या मते, गणपतीची मूर्ती दाखवून, तुमच्या मुलाला ते आहे तसे स्वीकारायला शिकवा. मुलांना सांगा की, तुमच्यातील दोषांना ताकद बनवा, कमजोरी नाही. मुलाला शिकवलेला हा गुण त्याला आयुष्यात खूप पुढे नेईल.

Ganesh Chaturthi 2022: रंकालाही राजा बनवणारा गणपतीचा हा एकाक्षरी मंत्र; विघ्न हरतो भक्तांची

पालक हे आपले जग आहे

मुलांना शिकवा की ज्याप्रमाणे गणपतीने आपल्या आई-वडिलांना आपले जग बनवले, त्याचप्रमाणे आपल्या मुलानेही आपल्या जीवनातून हे शिकले पाहिजे. गणपतीची ही कथा मुलांना खूप चांगला धडा देऊ शकते.

तुमच्याकडे जे आहे ते वापरा

तुम्ही तुमच्या मुलालाही गणपतीच्या जीवनातील एक गुण शिकवला पाहिजे की त्याच्याकडे जे काही आहे, ते घेऊन काम करावे. गणेशजींचे डोके धडापासून वेगळे केल्यावर त्यांना हत्तीच्या बाळाचे डोके लावण्यात आले. त्यानंतरही गणपती बाप्पा आनंदाने त्यांचे काम करत राहिले. मुलासाठी हे सर्वोत्तम उदाहरण आहे.

कधीही हार मानू नका

गणपतीच्या शरीराचा आणखी एक भाग तुमच्या मुलाला चांगले धडे देऊ शकतो. आणि तो म्हणजे त्यांचा तुटलेला दात. गणपती बाप्पाचा तुटलेला दात हे शिकवतो की आयुष्यात कधीही हार मानू नये. हा गुण तुम्ही तुमच्या मुलाला शिकवला पाहिजेत.

या राशीची मुलं असतात प्रचंड हट्टी आणि रागीट; त्यांना समजावणं सोपं काम नसतं

सर्वांचा आदर करणे

प्रत्येकजण उंदराचा तिरस्कार करतो, कारण त्यामुळे खूप नुकसान होते. गणेशजींची स्वारी हा उंदीर आहे आणि ते त्याचा आदर करतात. गणपतीच्या जीवनातून हे गुण तुमच्या मुलालाही शिकवावेत. जेणेकरून मूल लहानांचाही आदर करू शकेल.

गणपती बाप्पाच्या आयुष्यातील हे 5 गुण आहेत, जे तुम्ही तुमच्या मुलाला शिकवलेच पाहिजेत जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यात काहीतरी करू शकतील आणि हुशार होतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News