22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Belly fat prevention include these foods in your diet to prevent the growth of belly fat mhpj


मुंबई, 27 ऑगस्ट : ओटीपोटात अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे, केवळ पोट फारच पसरलेले दिसत नाही तर कंबरेची रुंदी देखील वाढते. त्यामुळे कोणताही ड्रेस व्यवस्थित बसत नाही. पोटाच्या जास्तीच्या चरबीमुळे अनेक आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मात्र थोडा व्यायाम आणि सकस आहाराचा अवलंब करून तुम्ही पोटाची चरबी वाढण्यापासून रोखू शकता आणि वाढलेली चरबी कमीदेखील करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत जे पोटाची चरबी वाढू नदेण्यास मदत करतात आणि वाढलेली चरबी कमीदेखील करतात.

फळं

स्टाइलक्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार फळांमध्ये असलेले जीवनसत्त्वे, आहारातील फायबर, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स पचनक्रिया सुधारतात. हेल्दी गट सूक्ष्मजंतूंची संख्या वाढवते. चयापचय वाढवते आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते. लिंबू, संत्री, मोसंबी, किवी, ग्रेपफ्रूट, स्ट्रॉबेरी इत्यादी लिंबूवर्गीय फळांचे सेवन केले पाहिजे कारण ते अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहेत.

मीठ आणि सैंधव मिठात नेमका फरक काय? कोणतं आहे आरोग्यासाठी लाभदायक

दालचिनी

जर तुम्ही पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असतील. मात्र तरीही तुम्हाला मनासारखा परिणाम मिळाला नसेल तर दालचिनीचा हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतो. एक कप पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर टाकून प्यायल्याने फायदा होऊ शकतो. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास खूप मदत होते.

काकडी

काकडी हा फायबरचा चांगला स्रोत मानला जातो. तसेच पोटाची चरबीदेखील काकडीच्या सेवनाने कमी केली जाऊ शकते. त्यात फक्त ९६ टक्के पाणी आहे. त्यात खनिजे, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीही काकडी फायदेशीर ठरते.

बदाम

बदामामध्ये हेल्दी फॅट आणि प्रोटीन असते. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी बदाम हे चरबी जाळण्याच्या प्रक्रियेसाठी पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. याव्यतिरिक्त ते ओमेगा -3 फॅटी ऍसिडमध्ये देखील समृद्ध आहे, जे ऊर्जा आणि चयापचय वाढवते.

दही आणि उकडलेली अंडी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी दही आणि अंडी तुम्हाला मदत करू शकतात. दही आणि अंड्यांमध्ये भरपूर प्रोटिन्स असतात. त्यासोबतच त्यामध्ये साखरेचे प्रमाणही नगण्य असते. प्रोटीनमुळे आपले पोट जास्त काळ भरलेले राहते आणि हे स्नायूंना सक्रिय ठेवण्यासही मदत करते.

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल

काही लोक स्वयंपाकासाठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल वापरतात. जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवलेले अन्न खावे कारण ते एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. एचडीएल (चांगले) कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. वजन कमी करण्यासाठी तसेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे उत्तम तेल मानले जाते.

Walking Barefoot : अनवाणी चालणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? हे आहेत फायदे आणि तोटे

बीन्स

आहारात रोज विविध प्रकारचे बीन्स खाल्ल्यानेही चरबी कमी होऊ शकते. यासोबतच स्नायूही मजबूत होतात आणि पचनसंस्थाही चांगली राहते. बीन्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते खाल्यानंतर तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्ही बाहेरचे इतर पदार्थ खाणे टाळता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News