23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Digital prime time life 25 wife and mother in law daughter in law fight relationship expert tips mhpl


“आमच्या लग्नाला 3 वर्षे झाली. तसं आम्हा दोघांत सर्वकाही ठिक आहे. पण आम्ही दोघं माझ्या आईबाबांसोबत राहतो. माझी बायको आणि माझ्या आईचं बिलकुल पटत नाही. अगदी जेवणासारख्या छोट्या गोष्टीवरून घरखर्चासारख्या मोठ्या गोष्टीपर्यंत त्यांची भांडणं होतात. मी बऱ्याचदा त्यांच्यातील वाद सोडवण्याचा, त्यांना समजावण्याचा, एकमेकींना समजून घेऊन किंवा शांतपणे आपापली मतं मांडण्याचा सल्ला दिला पण काहीच परिणाम झाला नाही”

“बायकोची बाजू घेतली तर आईला राग आणि आईची बाजू घेतली तर बायकोला राग. पण माझं दोघींवरही तितकंच प्रेम आहे. कुणा एकीची बाजू मी नाही घेऊ शकत आणि कुणालाच मला दुखवायचं नाही. पण त्यांच्यातील भांडणाचा मला खूप त्रास होतो, त्यांच्यातील ही भांडणं मिटवायची आहेत तर मी काय करू?”

मानसशास्त्रज्ञ डॉ. संजय चौघ – “घरात होणाऱ्या वादाचा कुटुंबातील सर्वच सदस्यांवर परिणाम होतो. जेव्हा दोन लोकांचं एकमेकांशी पटत नाही तेव्हा एकतर ते एकमेकांशी बोलणं बंद करतात किंवा मतभेद स्वीकारून वाद करणं टाळतात. पण तुमच्या परिस्थितीत तुमच्या बायको आणि आईच्या भांडणात तुम्ही तिसरी व्यक्ती आहेत ज्यांना मध्यस्थी करून हा वाद मिटवायचा आहे”

हे वाचा – Life@25 : सतत तिच्या एक्स-शी माझी तुलना; बायकोच्या मनातून त्याला बाहेर कसं काढू?

“या परिस्थितीत तुम्ही त्या दोघींशी बोललात, त्यांना समजवलात किंवा त्यांच्यावर ओरडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलात पण तरी काहीच परिणाम झाला नाही तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. अशावेळी तुम्ही या भांडणाच्या तुमच्या प्रतिक्रियेत बदल करा. यावेळी तुम्ही स्वतः कसे शांत राहाल यावर मार्ग शोधा. त्या दोघींचा संवादच असा आहे, बाकी काही नाही, त्या अशाच बोलतात असा विचार तुम्ही करा”

हे वाचा – Life@25 : “बायको माझ्यापेक्षा जास्त कमावते म्हणून सर्वजण माझी खिल्ली उडवतात”

“राहिला प्रश्न त्यांच्यातील प्रत्यक्षातील वाद कमी करण्याचा, तर त्या दोघींमध्ये एक अशी रेषा आखा ज्यामुळे त्यांना एकमेकींशी वाद घालण्यासाठी, भांडण्यासाठी फार संधी मिळणारच नाही. तशी वेळच येणार नाही”, असं डॉ. चौघ यांनी टाइम्स ऑफशी बोलताना सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News