3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

Seeing a black shivling in a dream is auspicious see how signals differ people to people mhpj


मुंबई, 05 सप्टेंबर : हिंदू धर्मात शिवलिंग हे विश्वाचे केंद्रबिंदू मानले जाते. शिवलिंग हे महादेवाचे प्रतीक आहे. धार्मिक कथांनुसार शंकर भगवान शिवलिंगाच्या रूपात विश्वात प्रथम अवतरले आहेत. सनातन परंपरेत शतकानुशतके शिवलिंगाची पूजा केली जाते. जर आपण स्वप्नात शिवलिंग पाहण्याबद्दल बोललो, तर स्वप्नात शिवलिंग दिसणे हे शुभ संकेत असल्याचे स्वप्न शास्त्र मानते. तुम्ही तुमच्या मागील जन्मी शिवभक्त होता असे यावरून दिसून येते असेही मानले जाते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा हे सांगत आहेत की स्वप्नात शिवलिंग दिसण्याचा अर्थ काय आहे.

बेरोजगार व्यक्तीसाठी

स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या बेरोजगार तरुण किंवा तरुणीला स्वप्नात शिवलिंग दिसले तर याचा अर्थ असा होतो की ते तुमच्यासाठी आगामी काळात शुभ चिन्ह घेऊन आले आहे. पण त्याचा परिणाम तेव्हाच दिसून येईल जेव्हा तुम्ही तुमचे काम पूर्ण संयमाने आणि प्रामाणिकपणे कराल. असे केल्याने तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही जीवनातील उंची गाठू शकाल.

Meaning Of Swastik : स्वस्तिक चिन्हाचा नेमका अर्थ काय? त्याचे प्रकार किती आणि काय आहे महत्व?

अविवाहित मुलगी

स्वप्न शास्त्र मानते की जर एखाद्या अविवाहित मुलीला स्वप्नात काळे शिवलिंग दिसले आणि तिचे लग्नाचे वय असेल तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तिचे लवकरच लग्न होणार आहे. तिला तिच्या इच्छेनुसार वर मिळेल.

व्यापारी

व्यापारी वर्गासाठी स्वप्नात काळे शिवलिंग दिसणे शुभ मानले जात नाही. स्वप्न शास्त्रानुसार व्यापारी वर्गाच्या लोकांना स्वप्नात काळे शिवलिंग दिसले तर त्यांना व्यवसायात अडचणींना सामोरे जावे लागू शकते, परंतु भगवान शंकराची पूजा केल्यास या समस्यांपासून लवकर सुटका मिळू शकते.

Vastu Tips : पारिजाताचे झाड लावल्याने मिळतात हे फायदे, दिशा मात्र चुकवू नका

आजारी व्यक्ती

स्वप्न शास्त्रानुसार, जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आजारी असेल आणि त्याला स्वप्नात काळे शिवलिंग दिसले तर हे त्याच्यासाठी शुभ संकेत आहे. आजारी व्यक्तीला स्वप्नात काळे शिवलिंग दिसणे हे त्याच्या आजारांपासून मुक्ती मिळण्याचे लक्षण आहे. यासाठी त्याने शिव शंकराच्या मंत्रांचा जप करावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News