23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Use the durva dedicated to ganesha like this vastu tips in marathi rp


मुंबई, 06 सप्टेंबर : आद्य पूजनीय श्रीगणेशाच्या पूजेमध्ये दुर्वाला खूप महत्त्व आहे. दुर्वाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते. श्रीगणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरात सुख-शांती नांदते. शास्त्रात दुर्वांशी संबधित काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने अनेक समस्या दूर होतील. जाणून घेऊया दुर्वाचे उपाय.

गणपती बाप्पाच्या पुजेमध्ये आपण फुले, अष्टगंध, गुलाल, दुर्वा आणि इतर पाने फुले असे विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो. यामध्ये दुर्वा ह्या गणपतीला जास्त आवडतात. पूजा झाल्यावर सर्व साहित्य अनेकजण वाहत्या पाण्यात सोडून देतात. पण, आपण तसे न करता ह्या दुर्वा एका विशिष्ट्य जागी ठेवल्या तर त्याचा खूप फायदा होतो, असे मानतात.

गणपतीला आपण ताज्या दुर्वा अर्पण करतो आणि कालच्या म्हणजे जुन्या/शिळ्या झालेल्या दुर्वा वाहत्या पाण्यात सोडून देतो. मात्र, असे न करता दुर्वा आपल्या घरातील महत्त्वाच्या ठिकाणी अवश्य ठेवून द्या. तो गणपती देवाचा आशीर्वाद समजून ती दुर्वा आपल्या घरातच ठेवा.

पूजा झालेल्यामधील थोडी दुर्वा आपल्या तिजोरीत, दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेऊ शकता. यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील. आर्थिक समस्याने निराकरण होऊ शकते. आपल्यावर येणारी संकटे कमी होतील. विविध अडचणी टऴू शकतील. घरात आनंदी वातावरण राहील. हा छोटासा उपाय करून पाहु शकता.

इतर उपाय –

कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी पाच दुर्वामध्ये 11 गाठी घालून भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या लवकर दूर होतात.

असे मानले जाते की कोणतेही काम दीर्घकाळ पूर्ण होत नसेल तर गायीच्या दुधात दुर्वा मिसळून त्याची पेस्ट बनवावी. त्याचा टिळा कपाळावर लावा, यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते.

हे वाचा –  Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला चंद्र का पाहायचा नसतो? त्यापाठीमागे अशी आहे कथा

कुटुंबात सौख्य टिकून राहावे आणि घरातील सुख-शांती भंग होऊ नये यासाठी बुधवारी गाईला दुर्वाचा हिरवा घास खाऊ घालणे शुभ मानले जाते.

बुधवारी गणपतीला 11 किंवा 21 दुर्वा अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते. लक्षात ठेवा की दुर्वा नेहमी जोडीने अर्पण करावी.

हे वाचा –  Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार कासवाचे हे उपाय करून बघा; नशिब चमकेल, व्हाल मालामाल

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News