27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Dry Fruit Facts and myth do you know these cashew almond health benefits informative mhds


मुंबई 4 सप्टेंबर : असं म्हणतात की आरोग्य चांगलं असेल, तर आपल्याला कोणत्याही समस्या जाणवत नाहीत. चांगल्या आरोग्यासाठी शारीरीक व्यायाम आणि पौष्टीक जेवण महत्वाचं आहे. ज्यामुळे लोक चांगला आहार जसे की फळ, ज्युस, सुकामेवा (ड्रायफ्रुट्स) खातात. असं म्हणतात की सुकामेवा आपल्या शरीराच्या सर्व पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्यामुळे लोकांनी ते दररोज खावे. परंतू असे असले तरी या ड्रायफ्रुट्सबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत.

सुक्या मेव्यांबद्दल लोकांना काही समज आणि गैरसमज आहेत, चला तर याबद्दल काही माहिती जाणून घेऊ.

बदाम

वस्तुस्थिती: हे खरे आहे की ममरा बदाम आरोग्यासाठी चांगले आहेत, कारण त्यात भरपूर मोनोसॅच्युरेटेड तेले असतात जे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास तसेच निरोगी कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करतात. त्यामध्ये नैसर्गिक साखर आणि प्रथिने देखील जास्त असतात.

तसेच कॅलिफोर्निया बदामावर प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे ममरापेक्षा कमी नैसर्गिक साखर, प्रथिने असतात. ते रोजच्या वापरासाठी योग्य आहेत. त्यामुळे तसे पाहाता शरीरासाठी दोन्ही बदाम फयद्याचे आहेत

मनुका

मनुकामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट असतात, त्यापैकी एक तोंडातील बॅक्टेरियाच्या वाढीला रोखतो. यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण करणार्‍या जीवाणूं दातांच्या पृष्ठभागावर चिकटून राहात नाहीत आणि दात चांगले राहातात.

क्रॅनबेरी

ड्राय क्रॅनबेरीमध्ये नैसर्गिक तंतू असतात जे पचण्यास वेळ घेतात आणि त्यामुळे भूक नियंत्रित करते, जे वजन कमी करण्यास मदत करते. क्रॅनबेरीमध्ये भरपूर पोषक असतात आणि कॅलरीज कमी असतात, जे तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असतात.

तुमच्या आहारात क्रॅनबेरीचा समावेश करा कारण त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामध्ये प्रोअँथोसायनिडिन देखील असतात, जे तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत.

हे वाचा : इम्युनिटी बूस्टशिवाय आवळा ज्युस पिण्याचे आहेत भरपूर फायदे; यकृतही राहते निरोगी

भिजवलेले बदाम

बदाम हे नैसर्गिक किंवा भिजवलेले आणि सोललेले दोन्ही प्रकारात आरोग्यासाठी खूप चांगले असतात. कॅलिफोर्निया बदाम भिजवून ठेवण्याची शिफारस केली जाते, कारण त्यावर प्रक्रिया केली जाते आणि सोलून टाकल्याने टॅनिनपासून मुक्त होण्यास मदत होते, जे पोषक तत्वांचे शोषण रोखतात.

भिजवलेले आणि सोललेले बदाम लिपेस नावाचे एंजाइम सोडण्यास मदत करतात जे चरबीच्या पचनास मदत करतात. तसेच भिजवलेले बदाम मऊ आणि पचायला सोपे असतात, जे पुन्हा पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करतात.

काजू

काजू खाण्याचा संबंध बऱ्याचजा उच्च कोलेस्ट्रॉलशी लावला जातो. परंतू हा एक गैरसमज आहे. वास्तविकता काही वेगळी आहे, कारण काजूमध्ये पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी 5 भरपूर प्रमाणात असतात. हे सूक्ष्म पोषक घटक उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करताना हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

हे वाचा : सतत तोंड आल्यानं खाण-पिणंही अवघड झालंय?; ‘या’ घरगुती उपायांतून मिळेल दिलासा

गैरसमज 5: ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने अतिसार होऊ शकतो.

वस्तुस्थिती: सुक्या फळांमध्ये नैसर्गिक घटक असतात जे तुमच्या आतड्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आणि आतड्यांसंबंधी हालचाल नियमित करण्यात मदत करतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मदत करण्यासाठी ते चांगला नैसर्गिक पर्याय आहेत.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News