23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Quitting alcohol effect on body, how human body reacts when you stop drinking alcohol suddenly mhpj


मुंबई, 4 सप्टेंबर : मद्यपान म्हणजेच दारूचे माणसाच्या आयुष्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. जेव्हा मद्यपान करण्याचे प्रमाण खूप वाढते तेव्हा ते खूप जास्त घातक असते. त्यामुळे मद्यपान कमी करणे किंवा बंद करणेच आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तुम्हाला माहित आहे का? जेव्हा एखादी व्यक्ती अचानक मद्यपान बंद करते. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक बदल होतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, अचानक मद्यपान बंद केल्यास आपल्या शरीरावर त्याचे कसे परिणाम होऊ शकतात. झी न्यूज हिंदीने यासंबंधित वृत्त प्रकाशित केले आहे.

‘डेलीस्टार’च्या रिपोर्टनुसार, मद्यपान करणे पूर्णपणे बंद केल्यास व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. या व्यतिरिक्त थकवा, चिंता, अस्वस्थता, हादरे, चिडचिड, भावनिकता, रक्तदाब वाढणे, डोकेदुखी, घाम येणे, झोप न लागणे, भूक न लागणे, हृदयाचे ठोके जलद होणे आणि लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता अशा समस्याही उद्भवू शकतात. म्हणूनच मद्यपान करणे कायमचे सोडताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.

Constipation Remedy : बद्धकोष्ठतेमुळे दिवसभर राहता त्रस्त? रात्री दुधात मिसळून प्या हा पदार्थ, त्रासातून व्हाल मुक्त

जेव्हा शेवटचे अल्कोहोल घेतलेले असते त्यानंतर शरीर डिटॉक्स होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो असे मानले जाते. एखादी व्यक्ती नियमितपणे मद्यपान करत असेल आणि नंतर अल्कोहोल सोडले तर त्या व्यक्तीच्या शरीराला बरे होण्यास वेळ लागतो. अल्कोहोल प्यायला लागताच त्याचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागतो. तसेच काही वेळाने त्याचा परिणाम शरीरावरही दिसू लागतो. मात्र यातील काही परिणाम लवकर दिसायला लागतात आणि काहींना थोडा वेळ लागतो. अल्कोहोलचे सतत सेवन केल्याने तुम्हाला उलट्या झाल्यासारखे वाटेल. यासोबतच डोकेदुखी, जुलाब, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, लिव्हर आणि हृदयविकार, कर्करोग, नैराश्य, अगदी शीघ्रपतन आणि वंध्यत्व यांसारख्या समस्यांचाही धोका असतो.

जेवल्यानंतर लगेच का येते झोप? फक्त आळसच नाही तर हे आहे वैज्ञानिक कारण

मद्यपान करणे सोडल्यास होणारे फायदे

1. लिव्हर खराब होण्यापासून वाचते.

2. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते.

3. चांगली झोप लागते.

4. अल्कोहोल बंद केल्याने आपल्याला चांगले जेवण जाते.

5. त्वचेचे आरोग्य सुधारते.

6. पचनक्रिया सुधारते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News