3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

Digital prime time life 25 law about driving rule for new learn drive to licence mhpl


मी प्रवीण म्हात्रे, आता 30 वर्षांचा आहे. 5 वर्षे झाली मी नोकरी करतो. तसं आता माझ्या करिअरमध्ये बऱ्यापैकी सेटल झालो आहे. आता ड्रायव्हिंग शिकून स्वतःची गाडी घेण्याचा विचार आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीत लागणारा माझा अधिक वेळही वाचेल आणि ड्रायव्हिंग शिकण्याची आवड, इच्छा असल्याने तीसुद्धा पूर्ण होईल. पण आवड असल तरी ड्रायव्हिंग माझ्यासाठी पूर्णपणे नवी. तसं मला फार त्याबाबत काही माहिती नाही. ड्रायव्हिंग आणि गाडी घेण्याबाबत तुम्ही काही सांगू शकता का? याबाबत काय नियम आहेत?

अॅड. सुजाता डाळींबकर – दुचाकी, कार किंवा इतर वाहन रस्त्यावर चालवायचे असेल तर फक्त वाहन घेणं पुरेसं नाही. त्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लोकांना आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते. पण आता तिथे जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुलै महिन्यापासून नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोक शासन मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग सेंटरमध्ये जाऊन ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेतील, त्यासाठी त्यांना प्रमाणपत्र मिळेल. चाचणीत यशस्वी झालेल्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवताना ड्रायव्हिंग टेस्टमधून सूट मिळेल. म्हणजेच त्यांना पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. मंत्रालयाने सांगितले की या केंद्रांमध्ये प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा तसंच ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक असतील, जेणेकरून उमेदवारांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देता येईल.

हे वाचा – Life@25 : लग्नानंतर मुलीने आडनाव बदलणं बंधनकारक आहे का?

पर्मनंट लायसन्स येण्याआधी तुम्हाला आरटीओकडून लर्निंग लायसन्स दिलं जातं. लर्निंग लायसन्स म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी अवधी दिला जातो. मात्र लर्निंग लायसन्स असताना वाहन चालवण्याचे काही नियम आहेत. तुम्ही कोणतेही वाहन चालवत असाल तर त्यावर इंग्रजी मूळाक्षर L लाल अक्षरात असायला हवा. दुसरा नियम म्हणजे लर्निंग लायसन्स असलं तरी तुमच्यासोबत पर्मनंट लायसन्स असलेला व्यक्ती असल्याशिवाय तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवू शकत नाही. याव्यतिरिक्त तुम्हाला वाहतुकीचे सर्व नियम पाळावे लागतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News