23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

Health benefits of healthy and tasty dark chocolate in Marathi rp


मुंबई, 03 सप्टेंबर : सर्व वयोगटातील लोकांना चॉकलेट खायला आवडते. डार्क चॉकलेट हे चवीला छान असते आणि पोषक घटकही त्यात भरपूर असतात. डार्क चॉकलेटमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, लोह, मॅग्नेशियम सारखी आवश्यक खनिजे असतात. ती आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चांगल्या प्रतीच्या डार्क चॉकलेटमध्ये 70-85 टक्के कोको असतो, त्यामध्ये हृदय-निरोगी ठेवण्याचे गुणधर्म असतात. त्यात ओलेइक अॅसिड, स्टीरिक अॅसिड आणि पाल्मिटिक अॅसिड यांसारखी निरोगी फॅटी अॅसिड देखील असते. डार्क चॉकलेटमध्ये कॅफिन आणि थिओब्रोमाइनसारखे ऊर्जा देणारे घटक देखील असतात. अनेक गुणधर्म असलेल्या डार्क चॉकलेट आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. जाणून घेऊया डार्क चॉकलेटचे आरोग्यदायी (Benefits of Dark Chocolate) फायदे.

डार्क चॉकलेटचे आरोग्य फायदे –

नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते :

healthline.com च्या माहितीनुसार, डार्क चॉकलेट त्वचा आणि चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे हानिकारक अतिनील किरणांपासून चेहऱ्याचे संरक्षण करते आणि नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते. फ्लॅव्हॅनॉल्स आणि बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स स्किन डेंसिटी वाढवतात आणि त्वचा सुंदर बनवतात.

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर :

डार्क चॉकलेट मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि मेंदूची क्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते, वर्बल लर्निंगमध्येही मदत होते.

हृदयविकाराचा धोका कमी :

डार्क चॉकलेट हृदयाशी संबंधित समस्यांशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे. काही संशोधनात असे दिसून आले आहे की, डार्क चॉकलेटच्या वापरामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका 9 ते 11 टक्के कमी होतो.

रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त :

डार्क चॉकलेट हा रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स बीपी कमी करतात आणि बायोएक्टिव्ह संयुगे रक्त प्रवाह सुधारतात.

हे वाचा – जेवल्यानंतर लगेच का येते झोप? फक्त आळसच नाही तर हे आहे वैज्ञानिक कारण

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित :

डार्क चॉकलेट एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. चांगल्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. डार्क चॉकलेट इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करून मधुमेहाच्या जोखमीपासून देखील संरक्षण करते.

हे वाचा – चित्रपटासाठी अभिनेत्यानं कमी केलं 18 kg वजन; आता ओळखणंही झालं कठीण

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैदयकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News