27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Man died while dancing at birthday party dance video trending from bareilly uttar pradesh mhpl


लखनऊ, 02 सप्टेंबर : मृत्यू कुणाच्याच हातात नाही. तो कधी कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. असाच मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीला नाचता नाचता मृत्यूने गाठलं आहे. पार्टीत नाचता नाचता ही व्यक्ती जमिनीवर अचानक कोसळली ती पुन्हा उठलीच नाही. या व्यक्तीचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील ही धक्कादायक घटना आहे.

प्रभार कुमार असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याचं सांगितलंं जातं आहे. गुरुवारी रात्री ते आपल्या मित्राच्या बर्थडे पार्टीला गेले होते. तिथं आपल्या डान्सचा जलवा सर्वांना दाखवत होते. ‘एक लड़की चाहिये खास-खास’ या बॉलिवूड गाण्यावर ते थिरकताना दिसले. त्यांना जबरदस्त डान्स करताना पाहून पार्टीतील इतर लोक त्यांचा उत्साह वाढवत होते.

हे वाचा – Shocking Video! लग्नात नाचता नाचता अचानक गेला व्यक्तीचा जीव; कॅमेऱ्यात कैद झाला ‘मृत्यू’

45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ज्यात ते 35 सेकंद प्रभात नाचताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताच थकवा, घाम किंवा भीती दिसत नाही आहे. आनंद आणि उत्साहच दिसतो आहे. 36 व्या सेकंदाला ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यांचं डोकं जमिनीला आपटतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News