12.8 C
New York
Monday, March 4, 2024

National nutrition week how important is nutrition during pregnancy heres what to eat and not mhpj


मुंबई, 02 सप्टेंबर देशातील लाखो बालके आजही कुपोषणाला बळी पडत आहेत. इतकेच नाही तर बहुतांश महिलांच्या गरोदरपणातील आहारात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीरात आयर्न, कॅल्शियमची कमतरता असते आणि ती आई आणि बाळासाठी अत्यंत हानिकारक असते. गर्भवती महिलेच्या आहारात आवश्यक खनिजे, जीवनसत्त्वे, प्रथिनांची कमतरता असेल तर आईसोबतच बाळही अशक्त होते.   ‘राष्ट्रीय पोषण सप्ताहा’चा निमित्ताना गरोदरपणातील आहार नेमका कसा असला पाहिजे हे पाहुयात.

भारतामध्ये दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या काळात ‘नॅशनल न्यूट्रिशन वीक 2022’ साजरा केला जातो. हा संपूर्ण आठवडा (National Nutrition Week 2022) योग्य आहार आणि पोषण याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. योग्य पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी सरकार ‘राष्ट्रीय पोषण सप्ताहा’दरम्यान विविध उपक्रम राबवते. याच निमित्ताने  क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अंशुल जयभारत यांच्याकडून जाणून घेऊया की गर्भधारणेदरम्यान आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि सध्याच्या काळात पोषणाचे महत्त्व काय आहे?

गरोदरपणात पोषणाचे महत्त्व

अंशुल जयभारत यांच्यानुसार प्रत्येक गर्भवती महिलेने गरोदरपणात पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गर्भातील बाळाचा विकास योग्य प्रकारे होतो. गरोदरपणाच्या सर्व त्रैमासिकांमध्ये जड किंवा दुप्पट खाण्याची गरज नाही. परंतु आहारात पोषक तत्वांचा संतुलित प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये लोहयुक्त पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. जसजसे रक्त पातळ होते तसतसे हिमोग्लोबिन थोडे कमी होते. अशा स्थितीत आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड असलेल्या गोष्टींचे सेवन करावे. दोन जेवणांमध्ये जास्त अंतर ठेवू नका आणि एकाच वेळी जास्त खाणे देखील टाळा.

व्यायामानेच कंट्रोलमध्ये राहिल डायबेटिस; मधुमेही रुग्णांसाठी जबरदस्त एक्सरसाइझ

गर्भधारणेदरम्यान आवश्यक पोषण

तुम्हाला गर्भधारणच्या संपूर्ण 9 महिन्यांच्या काळात निरोगी राहायचे असेल तर तुम्हाला अशक्तपणा किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या नसावी. तुमच्या आहारात कॅल्शियम, लोह, फोलेट (फॉलिक ऍसिड), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी12, प्रथिने यांसारखी जीवनसत्त्वांचा समावेश कारवा. तसेच तुमच्या आहारात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा समावेश अवश्य करावा.

गर्भधारणेदरम्यान काय खावे?

अंशुल जयभारत सांगतात, तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, ताजे घरगुती पदार्थ खावेत. आजकाल लोह खूप महत्वाचे आहे. अनेकदा महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि ती त्यांच्यासाठी व बाळासाठीही हानिकारक ठरू शकते. लोहासाठी तुम्ही पालक, बीटरूट, डाळिंब, ड्रायफ्रुट्स, तृणधान्ये, अंडी, लाल मांस, पेरू इत्यादी हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता. काही महिलांना बद्धकोष्ठतेची समस्या देखील असते. यासाठी संत्री, लिंबू, रास्पबेरी, नाशपाती, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू, इत्यादी फायबरयुक्त पदार्थ खावेत. ताज्या फळांपासून तयार केलेला रस प्यावा. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी प्यावे, तसेच लिंबूपाणी, नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक पौष्टिक घटक मिळतील. उलटी, मळमळची समस्या असेल तर सकाळी फळे खाल्ल्याने आणि आल्याचा वास घेतल्यानेही खूप फरक पडतो.

Side Effects Of Mushroom: मशरूम खाणं शरीरासाठी ठरू शकतं हानिकारक; होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

गर्भधारणेदरम्यान काय खाऊ नये

गरोदरपणात तुम्ही तुमच्या आहाराकडे जेवढे लक्ष द्याल, तेवढा तुमच्या मुलाचा शारीरिक आणि मानसिक विकास होत राहील. त्यामुळे तुम्ही जास्त तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड, पॅकबंद पदार्थ, अल्कोहोल, लाल मांस, जास्त फॅटी आणि कॅलरीयुक्त पदार्थ, रस्त्याच्या कडेला असलेले पदार्थ, सोडा, कोल्ड्रिंक्स इत्यादींचे सेवन टाळावे. लक्षात ठेवा गरोदरपणात कच्च्या पपई, अननसाचे सेवन टाळावे. कारण यामुळे काही वेळा आतड्याची हालचाल वाढते आणि गर्भपात होऊ शकतो. जास्त चहा, कॉफी देखील पिऊ नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News