13.3 C
New York
Monday, March 4, 2024

No baby bump without pregnancy symptom girl delivered baby after stomach pain in party mhpl


मेक्सिको सिटी, 02 सप्टेंबर : प्रेग्नन्सी म्हटलं की सुरुवातीला मासिक पाळी चुकणं, उलटी, मळमळ, चक्कर येणं अशी लक्षणं दिसतात. त्यानंतर हळूहळू पोटाचा आकार वाढत जातो, ज्याला बेबी बम्प म्हटलं जातं. पण एका एका महिलेमध्ये प्रेग्नन्सीची अशी कोणतीच लक्षणं दिसली नाही. तिचं बेबी बम्पही आलं नाही. रात्री तिच्या पोटात वेदना सुरू झाल्या आणि अचानक सकाळी तिने एका बाळाला जन्म दिला. आपण प्रेग्नंट होतो हे या महिलेलाही माहिती नव्हतं. जेव्हा तिची डिलीव्हरी झाली तेव्हा तिला याची माहिती झाली (Woman deliver baby without pregnancy symptoms).

मेक्सिकोत राहणारी 20 वर्षांची विवियन वाइज रुइजवेलास्‍को. तरुणी एका क्लबमध्ये बर्थडे पार्टी एन्जॉय करत होती. ऑक्टोबर 2021 ला ही पार्टी होती. तेव्हा अचानक तिच्या पोटात दुखू लागलं. विवियनने सांगितल्यानुसार, सुरुवातीला तिला हिप आणि पोटात वेदना होऊ लागल्या. हळूहळू वेदना वाढल्या म्हणून ती घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळीही तिच्या वेदना कायम होत्या. .याबाबत तिने तिचा बॉयफ्रेंड टोनाटियू गोंजालेजला सांगितलं. दोघंही डॉक्टरांकडे गेले.

हे वाचा – सकाळी जन्मलेल्या व्यक्तींची ही वैशिष्ट्ये असतात खास; इतक्या क्षेत्रात नाव कमावतात

डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून दोघांनाही धक्का बसला.  कारण  तिच्या पोटातील वेदना सामान्य नव्हत्या. तर तिला प्रसूती वेदना होत होत्या.  ती प्रेग्नंट होती. आश्चर्य म्हणजे तिच्यात प्रेग्नन्सीची कोणतीच लक्षणं नव्हती, तिचं बेबी बम्पही दिसत नव्हतं, तिला मासिक पाळीही येत होती, ती एक्सरसाइझही करत होती. सर्वकाही सामान्य होतं त्यामुळे आपण प्रेग्नंट आहोत याची माहिती या तरुणीलाच नव्हती. डॉक्टरांनी सिझेरियन डिलीव्हरी केली. तिने एका मुलाला जन्म दिला.

द मिररच्या रिपोर्टनुसार तरुणी आपल्या टिकटॉक अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत आपल्या प्रेग्नन्सीचा हा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. विवियनचा हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट आल्या. काही  युझर्सने आपल्यासोबत असंच घडल्याचं सांगितलं.

प्रेग्नन्सीच्या लक्षणांशिवाय बाळ जन्माला येणं शक्य आहे का?

प्रेग्नन्सीच्या लक्षणांशिवाय बाळ जन्माला येण्याचं हे पहिलं प्रकरण नाही याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार याला क्रिप्टीक प्रेग्नन्सी (cryptic pregnancy) किंवा प्रेग्नन्सी डिनाइल (pregnancy denial)  म्हणतात.

हे वाचा – Life@25 : लग्नाला वर्ष झालं नाही की सर्वांना आता हवी ‘गूड न्यूज’; त्यांना हँडल कसं करायचं?

तरुण महिला ज्या कधी प्रेग्नंट झाल्या नाहीत किंवा अशा महिला ज्यांना आपली रजोनिवृत्ती जवळ आली असं वाटतं किंवा ज्या गर्भनिरोधक वापरत नाही अशा महिलांमध्ये अशी प्रेग्नन्सी दिसून येते. पण एखाद दिवशी गोळी घणं राहिलं किंवा डायरिया असेल तर अशी प्रेग्न्सी होऊ शकते. अनियंत्रित मासिक पाळी असलेल्या महिलांनादेखील त्या प्रेग्नंट आहेत, अशी लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यांना पीसीओएसची समस्या आहे आणि ज्यांच्यामध्ये हार्मोन्स अनियंत्रित आहेत. अशा महिलांमध्येसुद्धा अशी प्रेग्नन्सी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News