12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Prediction behaviour of morning born person rp


मुंबई, 02 सप्टेंबर : जन्माला आलेल्या सर्वांचे जीवन, व्यक्तिमत्व आणि भविष्य हे त्यांच्या जन्माच्या वेळेवरच बहुतांशी अवलंबून असतं. जन्मावेळीची रास, कोणता ग्रह, कोणते नक्षत्र होते, या सर्व गोष्टींसह ज्योतिषाचे जाणकार त्या व्यक्तीचे भविष्य आणि चारित्र्य याबद्दल बरीच अचूक माहिती देऊ शकतात. नक्षत्रांची स्थिती आणि ग्रहांचा प्रभाव पाहून कुंडलीही तयार केली जाते, ज्यावरून व्यक्तीच्या पूर्व काळ किंवा भविष्याचा अंदाज लावता येतो. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा आपल्याला सकाळी जन्मलेल्या व्यक्तीबद्दल सांगत (Morning Born People) आहेत.

– सकाळी जन्मलेले लोक

ज्योतिषशास्त्रात सूर्योदयाच्या वेळेला दिवसाचा पहिला प्रहर म्हणतात. वेळेनुसार पाहिल्यास हा सकाळी 6 ते 9 या वेळेत मानला जातो. हिंदू धर्मात या प्रहरात पूजा आणि इतर शुभ कार्ये केली जातात. या प्रहरात जन्मलेली व्यक्ती जीवनात नेहमीच प्रगती करत राहते, परंतु आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांची प्रकृती थोडीशी खराब राहते.

हे वाचा –  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

पहिल्या प्रहरात जन्मलेले लोक लवकरच प्रकृतीच्या समस्येवर मात करून प्रगती करतात. या प्रहरात जन्माला आलेली मुले तीक्ष्ण बुद्धी आणि सत्यवादी असतात, म्हणूनच ते त्यांच्या जीवनात मोठे स्थान प्राप्त करतात.

हे वाचा – येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

– सकाळच्या उत्तरार्धात जन्मलेली मुले

वेळेच्या दृष्टीने सकाळचा दुसरा प्रहर 9 ते 12 वाजेपर्यंतचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या प्रहरात जन्मलेली मुले राजकारण आणि प्रशासकीय सेवांमध्ये चांगले भविष्य घडवतात. या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्वशक्ती असते. अशा व्यक्ती त्यांच्या आयुष्यात इच्छित संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News