12.8 C
New York
Monday, March 4, 2024

Social Media Addiction in youth. Read symptoms, causes and treatment mhsa


मुंबई, 30 ऑगस्ट: 21 व्या शतकात इंटरनेटचा शोध लागला आणि लोकांच्या जीवनपद्धतीत कमालीच फरक झाला. इंटरनेटनं  आपल्यासोबत अनेक मोठ्या संधी आणल्या. आता फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल इत्यादी सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून जग जवळ आलं आहे. केवळ आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत मर्यादित असणारे लोक आता जगभरातील विविध ठिकाणी राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधत आहेत, त्यांना जाणून घेत आहेत. अलीकडची तरुणाई तर अक्षरश: सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोशल मीडियावर तुटून पडलेली असते. परंतु  म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे वाईटच…सोशल मीडियाचा अतिवापर (Social Media Addiction) ही आजकालच्या तरूणाईपुढची प्रमुख समस्या बनली आहे. आपण सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, याची तरुणांना जाणीवही नसते. सोशल मीडियाच्या नादात तरुणांना तहान, भूक, झोप अशा गोष्टींचाही विसर पडतो. एकंदरीतच सोशल मीडियाचं व्यसन ही तरुणाईपुढची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सोशल मीडियाच्या व्यसनाची कारणे:

तरुणांना सोशल मीडियाचं व्यसन लागण्यामागील मुख्य कारण शोधणं तसं कठीण आहे. कारण ते प्रत्येकाच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. प्रत्येक वेळी आपण काहीतरी पोस्ट करतो तेव्हाची भावना यावर अवलंबून असते. चांगली रसायने सोडली जातात ज्यामुळे आपल्याला चांगले वाटते. काही सामान्य कारणे कमी होऊ शकतात:

प्रत्येक वेळी जेव्हा आपण काहीतरी पोस्ट करतो तेव्हा आपल्याला आनंद वाटतो. ज्या लोकांना आत्मविश्वास नसतो किंवा सतत इतरांबद्दल विचार करतो आणि त्याला काय वाटते अशा लोकांना सोशल मीडियाचे जास्त व्यसन असते की सोशल मीडिया त्यांना एक प्रकारचे लक्ष देते. समोर न बोलता बोलण्याची किंवा व्यक्त होण्याची संधी देते.

सोशल मीडियाच्या व्यसनाची लक्षणे कोणती?

 • सोशल मीडिया व्यसन ही आजकाल सामान्य समस्या बनली आहे. काही लक्षणांवरून तुम्ही सोशल मीडियाच्या आहारी गेला आहात याचं निदान केलं जाऊ शकतं. यापैकी काही लक्षणं पुढीलप्रमाणं असू शकतात.
 • कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सोशल मीडियाचा अनुभव घेत असताना उत्साही वाटणं.
 • भावनांवरील नियंत्रण न राहिल्यामुळं व्यक्ती आपलं भान गमावते.
 • अंधुक दृष्टी, शांत झोप न लागणं आणि डोकेदुखीची समस्या ही सोशल मीडियाच्या व्यसनाची काही शारीरिक लक्षणं आहेत.
 • सोशल मीडियावर कनेक्ट नसल्यास चिंता वाटणं.
 • दररोज अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल अपडेट करणं अनिवार्य वाटणं.
 • लोकांच्या समूहासोबत असतानाही एकटं राहणं.
 • सोशल मीडियापासून जबरदस्तीनं दूर केल्यावर राग येणं.
 • साध्या साध्या गोष्टींवरून राग येणं.
 • एकटेपणा आणि उदास वाटणं

हेही वाचा- Morning headache: सकाळी उठल्यावर डोकं दुखतं? समजून घ्या कारणं अन् उपचार

सोशल मीडिया व्यसनावर उपचार:

आजकालच्या तरुणांमध्ये ही समस्या गंभीर होत चालली आहे. कारण किशोरवयीन मुलं सोशल मीडियाच्या अधिकाधिक व्यसनाच्या आहारी जात आहेत. या व्यसनाचं निदान आणि उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मनोचिकित्सकाचा सल्ला घेणं. सोशल मीडियाचा अतिवापरामुळं व्यक्तीच्या वर्तनात लक्षणीय बदल होत असल्यानं आणि अचानक त्याचा वापर बंद केल्यानं ते त्रासदायक होऊ शकतं. सोशल मीडिया व्यसनाधीनतेसाठीचे उपचार हे दारुच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या उपचारासारखं असू शकत नाहीत.सोशल मीडियाच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी दिशात्मक उपाययोजना कराव्या लागतील

सोशल मीडियाचे व्यसन टाळण्यासाठी प्रतिबंध:

सोशल मीडियाचे व्यसन एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात कसे व्यत्यय आणू शकतं हे वरील लक्षणं दर्शवतात. म्हणून आपण हे व्यसन वेळेत नियंत्रित करू शकलो आणि थांबवू शकलो तर अतिशय फायदेशीर राहिल. याला प्रतिबंध करण्याचे काही मार्ग म्हणजे सोशल मीडिया वापरण्याऐवजी  तुमच्या फावल्या वेळेत वाचनाची सवय लावणं, कोडी सोडवणं इत्यादी छंद जोपासणे.

 • तुम्ही हा वेळ तुमच्या मित्रांशी बोलण्यात किंवा काहीतरी नवीन शिकण्यात घालवू शकता.
 • फावल्या वेळात एकादा नाविण्यपूर्ण प्रोजेक्ट बनवा, कथा- कादंबऱ्या वाचायला आवडत असतील तर वाचा. काही लोकांना कविता, गाणी लिहायलाही आवडतात.
 • क्रिकेट, कबड्डी, टेबल टेनिस, फूडबॉल असे तुमच्या आवडीचे खेळ खेळा.
 • जिम किंवा योगासनं करा.
 • तुमच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News