27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

Who is Gauri of Ganapati? How Jyeshtha Gauri festival celebrated? mhpj


मुंबई, 03 सप्टेंबर : गणपती उत्सवात येणारा ज्येष्ठा गौरीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर जेष्ठा गौरींच घरोघरी आगमन होते. यंदा 3 सप्टेंबर रोजी (Jyeshtha Gauri 2022 Date) ज्येष्ठा गौरीं आवाहन आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते.

ज्येष्ठा गौरीच्या या सणाला राज्यातील काही भागात महालक्ष्मी देखील म्हटले जाते. गौरी आगमनानंतर 2 दिवस मनोभावे पूजा केली जाते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन असते. त्यामुळे त्यांना जेष्ठागौरी असे म्हटले जाते. राज्यातील वेगवेगळ्या भागांत गौरी पूजनाची पद्धत, प्रथा आणि मान्यता वेगवेगळी आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं. यासोबतच घरगुती गणपतींचही विसर्जन होतं.

गौरी गणपतीची कोण लागते?

राज्यात ज्येष्ठा गौरी पूजनाच्या प्रथा आणि पद्धती वेगवेगळ्या आहेत, तशी मान्यताही वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी गौरीला गणपतीची बहीण किंवा बायकोही मानले जाते. बऱ्याच भागात गौरी गणपतीची बहीण असल्याची मान्यता आहे, त्यामुळेच ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असे मानले जाते. परंतु बहुतांशा ठिकाणी गौरीला गणपतीची आई मानले जाते. गौरीला माहेरवाशीण देखील म्हटले जाते. गौरीच्या रुपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते अशी एक मान्यता आहे.

गौरी पूजनाची एक कथा देखील प्रचलीत आहे. या कथेनुसार एकेकाळी असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रियांनी देवी गौरीकडे आपले सौभाग्य अक्षय्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानंतर देवी गौरीने असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. त्यामुळे महालक्ष्मी गौरीच्या कृपेमुळे स्त्रियांना सौभाग्य प्राप्त झाले. तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या, अशी आख्यायिका आहे.

Numerology: तुमची जन्मतारीखही देते भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

कसा साजरा केला ज्येष्ठा गौरीचा सण

गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींचे घरोघरी आगमन होते. घरासमोर रांगोळी काढून गौरींच्या पायांचा ठसे उमटवत त्यांना तुळशी वृंदावनाजवळून घरात आणले जाते आणि त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. विविध फळांच्या राशी रचल्या जातात, मखर सजवले जाते आणि त्यात गौरींची स्थापना केली जाते. महाराष्ट्राच्या विविध भागात ज्येष्ठा गौरी व्रत करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी धातूची किंवा मातीची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. राज्यात काही ठिकाणी पाच छोटी मडके घेऊन त्यांची उतरंड रचली जाते आणि त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा स्थापन केला जातो. परंतु जवळपास सर्व ठिकाणी गौरींच्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवले जाते.

लहान मुलांना का लागते दृष्ट? घराघरातील नजर उतरवण्याचे उपाय खरंच आहेत का उपयोगी?

गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. महालक्ष्मी पुजनाच्या दिवशी महाप्रसाद बनवला जातो. या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या आणि गोड पदार्थ बनवले जातात. महालक्ष्मी पूजनासाठी बनवण्यात येणाऱ्या महाप्रसादात रव्याचे आणि डाळीचे लाडू, चकल्या, करंजी, शंकरपाळे असे विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवले जातात आणि गौरींना नैवेद्य दाखवला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News