3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

World coconut day why coconut is good for skin in Marathi rp


मुंबई, 02 सप्टेंबर : हिंदू धर्मात नारळाला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे. एखादे शुभ कार्य असो किंवा एखाद्या गोष्टीचे उद्घाटन असो, नारळाचा वापर प्रत्येक कामात अत्यंत महत्त्वाचा आहे. याशिवाय नारळ फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर नसून त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. नारळ पाण्यामध्ये असंख्य औषधी गुणधर्म आहेत. नारळात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे सुपर फूड्सच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. नारळाचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठीही केला जातो. उत्तम आरोग्य आणि चांगल्या त्वचेसोबत गरोदरपणात नारळ पाणी, खोबऱ्याचे आश्चर्यकारक फायदे होतात. जागतिक नारळ दिवसानिमित्त जाणून घेऊया नारळ खाण्याचे खास (World Coconut Day 2022) फायदे.

नारळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही –

हेल्थ शॉट्सनुसार, नारळात फायबरचे प्रमाण चांगले असते. जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर नारळ खाणे तुमच्यासाठी खूप चांगले आहे. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्याही नियंत्रणात राहतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर-

नारळ खाल्ल्याने केवळ तुमची त्वचाच नाही तर केसांचे आरोग्यही सुधारते. केस कोरडे असल्यास ते देखील कमी होतील. याशिवाय नारळात असलेले फॅट त्वचेचे पोषण करते. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि ती हायड्रेटेड राहते.

वजन कमी करण्यास उपयुक्त –

वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात नारळाचा अवश्य समावेश करा. नारळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. ट्रायग्लिसरायड्सने समृद्ध असलेले नारळ शरीरात जमा झालेली चरबी झपाट्याने कमी करण्यास मदत करते.

हे वाचा – भाग्य आणि धनाचे प्रतिक असतं क्रिस्टल कमळ; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून घरी ठेवतात

रोगप्रतिकारशक्ती वाढवते –

कच्चे खोबरे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. नारळ खाल्ल्याने तुम्ही सर्व प्रकारच्या विषाणू आणि संसर्गापासून दूर राहू शकता. तसेच अनेक आजार होण्यापासून टाळू शकता.

हे वाचा – लिव्हर दान केल्याने डॉक्टरने जे करू नको सांगितलं, त्यातच पठ्ठ्याने रेकॉर्ड केला

अल्झायमरचा धोका कमी होईल –

नारळात ट्रायग्लिसराइड्स असतात, ज्यामुळे अल्झायमरचा धोका कमी होतो. नारळामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर नियमितपणे नारळ खाणे सुरू करा. पण, जीवनशैलीत कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News