22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Digital prime time Life 25 law in india is changing woman sirname after marriage is mandatory mhpl


मी वर्षा भोसले, 30 वर्षांची आहे. नुकतंच माझं लग्न ठरलं आहे. काही दिवसांत माझं लग्न होईल. लग्नानंतर आता मुलींचं नाव बदललं जात नसलं तरी आडनाव हे बदलतंच. पण मला माझं नाव बदलायचं नाही, अगदी आडनावसुद्धा.

नावात काय आहे असं म्हणतात पण नावातच सर्वकाही असतं ना… आज मला माझ्या क्षेत्रातील कित्येक लोक मला माझ्या पूर्ण नावानेच ओळखतात. माझी ती एक ओळख आहे आणि मला माझी ओळख बदलायची किंवा पुसून टाकायची नाही.  कायद्यानुसार आडनाव बदलणं बंधनकारक आहे का? आडनाव नाही बदललं तर काय फरक पडणार आहे? त्याचा काय परिणाम होईल किंवा काही समस्या उद्भवेल का?

अॅड. सुजाता डाळींबकर – “खरंतर लग्नानंतर मुलीला तिचे आडनाव बदलावे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त एका मुलीला असायला हवा. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणे पूर्णपणे चुकीचे आहे. मुलीचे नाव ही तिची ओळख असते. तिला तिची ओळख बदलायची आहे की नाही हे तिच्यावर अवलंबून आहे”

“लग्नानंतर आडनाव बदलणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. ही आजवर चालत आलेली परंपरा आहे, पण आजची तरुणाई, मग तो मुलगा असो की मुलगी, एका मुलीने आपलं नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, हे समजून घ्या. केवळ परंपरेच्या नावाखाली ते बदलणे कुठेही योग्य नाही. तुमच्या लग्नाची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. भारतात तुम्ही तुमच्या लग्नाची नोंदणी दोन कायद्यांनुसार करू शकता. पहिला म्हणजे हिंदू विवाह कायदा, 1955 आणि दुसरा विशेष विवाह कायदा 1954. या व्यतिरिक्त इतर धर्मीय विवाह कायद्यानुसार देखील विवाहाची नोंद होते”

हे वाचा – Digital Prime Time : कायद्याचा बोला! गणेशोत्सवात उत्साह हवाच पण वाट्टेल तितक्या मोठ्या आवाजात गाणी लावली तर काय?

“तुमच्याकडे कायदेशीर विवाह नोंदणी असेल तर तुम्हाला कुठेही कायदेशीर कामात अडचण येणार नाही. तुम्ही पत्नी असल्याचा पुरावा म्हणून मॅरेज सर्टीफिकेट पुरावा म्हणून दाखवू शकता. आपल्याकडे अजूनही आडनाव बदलण्याची परंपरा सुरू असल्याने तुमची अनेक ठिकाणी अडचण होऊ शकते. मात्र, तुम्ही विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र दाखवून पुरावा देऊ शकता. तरीही तुम्हाला कोणी रोखलं तर तुम्ही त्या विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार नोंदवू शकता. तिथेही दाद मिळाली नाही तर तुम्हाला न्यायालयात जाण्याचाही अधिकार आहे”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News