3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

Do not sleep and keep your legs in this direction get bad effect on health rp


मुंबई, 01 सप्टेंबर : मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा काहींना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असं नसतं की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणूनबुजून करते, परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात, ज्याचा जीवनावर वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे. वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे, यासाठी दिशाही निश्चित केली आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोके आणि पाय करून (Vastu Tips For Sleeping Direction) झोपावे, याबद्दल इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगत आहेत.

शरीरातून ऊर्जा निघून जाते –

एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते, कारण चुकीच्या दिशेने पाय ठेवून झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते.

या दिशेला पाय करून झोपू नये –

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. दक्षिण दिशा ही यमदूत, यम आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला पाय करून झोपू नये.

पूर्व दिशेलाही पाय करू नये –

वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला पाय करून झोपू नये. म्हणजे पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपू नये. त्याचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.

हे वाचा –  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यास काय होते?

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, जर व्यक्ती पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपली, तर मनात नकारात्मक विचार आणि भीतीदायक स्वप्ने पडतात. याशिवाय व्यक्ती निराशा आणि भीतीचे बळी ठरते.

कोणत्या दिशेला पाय करून झोपावे?

वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख, समृद्धी, शांती, संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. याशिवाय पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने ज्ञान मिळते.

हे वाचा – येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती वास्तुशास्त्रावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News